नेशन न्यूज मराठी टीम.
नांदेड / प्रतिनिधी – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हिमायतनगर तालुक्यातील कामारी येथील सुदर्शन देवराय या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. सकल मराठा समाजाने टायर जाळून शासनाचा निषेध केला.
यावेळी एका दुकानाची तोडफोड देखील करण्यात आली. दरम्यान शासनाने मराठा समाजाला आरक्षण द्यावे, मयताच्या कुटुंबियांनी 50 लाख रुपयाची आर्थिक मदत करावी, अशी मागणी देखील मराठा समाजातर्फे करण्यात आली आहे. या घटनेने हिमायतनगर तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. दरम्यान जमावाला शांत राहण्याचा माजी आमदार नागेश पाटील यांनी संदेश दिला आहे.