महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image चर्चेची बातमी ठाणे

प्रशासन सुस्त, स्पर्धा भरवण्यात व्यस्त, जनता त्रस्त, नागरी समस्यांनी त्रस्त नागरिकांची पालिकेविरोधात बॅनरबाजी

नेशन न्युज मराठी टिम.

https://youtu.be/_NgR4dPzspo

कल्याण/प्रतिनिधी – कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने विविध स्पर्धा आणि उपक्रम राबविण्यात येत असून कल्याण पश्चिमेतील रोहिदास वाडा प्रभागात विविध नागरी समस्यांनी त्रस्त असलेल्या नागरिकांनी या विरोधात प्रशासन सुस्त, स्पर्धा भरवण्यात व्यस्त, जनता त्रस्त; काय तो रस्ता, काय ती गटारे, काय तो कचरा एकदम ओके अशी बॅनरबाजी करत आपला निषेध व्यक्त केला आहे.     

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपून दोन वर्षाहून अधिक कालवधी लोटला असून केडीएमसी प्रशासनामार्फत महापालिकेचा कारभार चालवला जात आहे. प्रशासनावर लोकप्रतिनिधींचा वचक नसल्याने अनेक प्रभागात रस्ते, गटार, कचरा आदी समस्या भेडसावत आहे. नागरिकांना या समस्या भेडसावत असतांना पालिका प्रशासन मात्र वेगवेगळ्या स्पर्धा आणि उपक्रम राबविण्यात व्यस्त आहे. या विरोधात केडीएमसीचे माजी नगरसेवक रमेश वाळंज आणि माजी नगरसेविका उषा वाळंज यांनी कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बॅनरबाजी केली आहे.

या बॅनरवर एकीकडे कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयोजित स्वच्छ सर्वेक्षण २०२३ माझी वसुंधरा अभियान, गणेश दर्शन स्पर्धेचा उल्लेख करण्यात आला आहे. या स्वच्छ सर्वेक्षणात तुंबलेली गटारे, अस्ताव्यस्त पडलेला कचरा तर माझी वसुंधरा अंतर्गत रस्त्यावरील खड्ड्यात झाडे लावा, भरघोस बक्षिसे जिंका असे आवाहन करण्यात आले आहे. पालिकेच्या स्पर्धांप्रमाणे प्रभाग क्र. ३५ मधील नागरिकांतर्फे देखील स्वच्छ कल्याण, आपली वसुंधरा अभियान स्पर्धा आयोजित करत जनतेच्या निर्णयाने या स्पर्धेत केडीएमसी अधिकाऱ्यांना विजयी घोषित केले आहे. यामध्ये प्रथम क्रमांक क प्रभाग कार्यकारी अभियंता, द्वितीय क्रमांक क प्रभाग बांधकाम अधिकारी तर तृतीय क्रमांक क प्रभाग घनकचरा अधिकारी उपायुक्त यांना देण्यात आला आहे. 

रोहिदास वाडा प्रभागातील रस्त्यांवर मोठे खड्डे असून गटारे साफ नाहीत, तर रस्त्यावर कचरा देखील भरपूर आहे. या नागरी समस्यांबाबत गेल्या ४ महिन्यांपासून पालिका प्रशासनाला पत्रव्यवहार करत असून पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. असे असतांना पालिका  वेगवेगळ्या स्पर्धा आणि उपक्रमांमध्ये व्यस्त असून पालिकेने रस्ते, गटार, कचरा याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. रोहिदास वाडा प्रभागातील आंबेडकर रोड, वाल्लीपीर रोड, मच्छीबाजार रोड हे रस्ते चांगल्याप्रकारे  बनविण्याची मागणी माजी नगरसेवक रमेश वाळंज यांनी केली आहे.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×