नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
कल्याण/प्रतिनिधी – येत्या नवीन दिवसाबरोबर कल्याणात गुन्हेगारीचे प्रमान वाढत आहे. दिवसेंदिवस घडणाऱ्या या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यातच कल्याण स्टेशन परिसरात गेल्या काही दिवसांपासून एक तरुण देशी कट्टा घेऊन फिरत होता. एटीएम समोर देशी कट्टा कमरेला लावून फिरणाऱ्या सोनू झा नावाच्या या तरुणाला पोलिसांनी आता अटक केली आहे. सोनूकडे गावठी कट्टयासह चार एटीएम कार्ड सापडली आहेत. सोनू हा एटीएम सेंटरमध्ये नागरीकांना बोलण्यात गुंतवून त्यांचे पैसे लूटणाऱ्या टोळीचा सदस्य असल्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा तपास महात्मा फुले पोलिस ठाणे करीत आहेत.
कल्याण महात्मा फुले पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी तानाजी वाघ यांना माहिती मिळाली की, एक व्यक्ती संशयीतरित्या महालक्ष्मी हॉटेल परिसरात फूटपाथवर फिरतोय. या व्यक्तीच्या कमरेला बंदुकी सारखी वस्तू लटकत असल्याची माहिती मिळाली होती. तानाजी वाघ यांनी याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश साळवी यांना दिली. शैलेश साळवी यांनी महालक्ष्मी हॉटेल परिसरात पोलिस पथकाला तातडीने पाठविले. या ठिकाणी एक तरुण पोलिसांना संशयास्पदरीत्या आढळून आला. पोलिसांनी सापळा रचून सोनू झा ला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली. त्याच्या कमरेला बंदूक आढळून आली. तसेच सोनूकडे ४ एटीएम कार्ड मिळाले.
सोनू झा नावाचा हा तरुण मूळचा बिहारचा राहणारा आहे. तो अनेक दिवासांपासून उल्हासनगर मध्ये राहत होता. ज्या प्रकारे सोनू झा कडे विविध एटीएम कार्ड आढळून आली. या बाबत वरिष्ठ पोलिस निरिक्षक शैलेश साळवी यांनी सांगितले की, एटीएम एक्सचेंजचा गुन्हा करताना नागरिकांना बंदूक दाखवून घाबरवण्यासाठी सोनू गावठी कट्टयाचा वापर करीत होता. त्यावरुन तो एटीएम एक्सचेंज करुन नागरीकांना लूबाडणाऱ्या टोळीचा सदस्य असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्याच्याकडून ९२ एटीएम कार्ड पोलिसांनी हस्तगत केली होती. सोनू झा हा दिपकचा साथीदार असल्याची शक्यता आहे. दीपक झा याच्या प्रकरणात पोलिसांना एक आरोपी हवा होता. पोलिस त्याचा शोध घेत होते दीपक झाने त्याचे नाव उघड केले नव्हते. तो व्यक्ती सोनू झा आहे का या अंगाने पोलिस तपास करीत आहेत.