नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
नवी मुंबई/प्रतिनिधी – नवी मुंबईतील तळोजा जेल परिसरात एका 19 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळला होता. तिची हत्या करण्यात आले असल्याचे समोर आले आहे. कळंबोलीत राहणारी 19 वर्षीय तरुणी मागील एक महिन्यापूर्वी घरातून कॉलेजला जाते म्हणून घरातून निघून गेली होती. या मुलीची मिसिंग केस 12 जानेवारीला दाखल करण्यात आली होती. त्याच दिवशी एका मुलाने ट्रेनखाली आत्महत्या केली होती व त्याच्यासोबत असणाऱ्या सुसाईड नोटमध्ये मी मैत्रीणीची हत्या केली असे लिहिले होते. त्याच मुलीचा मृतदेह तळोजा तुरुंगामागील बाजूस असणाऱ्या जंगलात आढळला आहे.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शव विच्छेदन करण्यासाठी रुग्णालयात दाखल केला आहे. 19 वर्षीय या तरुणीचे मागील चार ते पाच वर्षांपासून एका मुलासोबत प्रेम संबंध होते मात्र तिने प्रेम प्रकरण पुढे सुरू ठेवण्यास नकार दिल्याने मुलाने आपल्या दोन साथीदारांसोबत मुलीची हत्या केल्याचे समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे घटनेतील मुलानेही ट्रेन मधून उडी घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. याबाबत अधिक तपास सुरु असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे उपायुक्त अमित काळे यांनी दिली आहे.