नेशन न्यूज मराठी टिम.
कल्याण/संघर्ष गांगुर्डे – समाजाचं ऋण मान्य करून समाजासाठी कार्य करणे तसेच आपल्या कर्तुत्वाने स्वतःचं आणि समाजाचं नाव उंच केल्यास समाज आपली नक्कीच दखल घेतो आणि आपल्याला सन्मानाने बोलावतो यासाठी प्रत्येकाने आपल्या क्षेत्रात मेहनत करून आपला मान मिळवावा असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी कल्याणमध्ये केले. कल्याण येथील सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समिती कल्याण या संस्थेचा 35 वा वर्धापन दिन नुकताच उत्साहात साजरा झाला यावेळी धनंजय मुंडे बोलत होते.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांना अखिल महाराष्ट्र मंडळ सेवा समितीतर्फे राज्यस्तरीय वंजारी समाज भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यांना सन्मानचिन्ह मानपत्र व शाल श्रीफळ देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरव झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला समितीच्या 35 वर्षाच्या वाटचालीचा आढावा घेणारी चित्रफीत दाखवण्यात आली तसेच यावेळी पाहुण्यांच्या हस्ते बांधिलकी या स्मरणिकेचे पारंपरिक पद्धतीच्या वाद्याच्या मिरवणुकीत वाजत आणून प्रकाशन करण्यात आले. यावेळी संस्थेच्या वतीने कोमल आंधळे सानप व बाळासाहेब दराडे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच संभाजी देशमुख पोलीस उपनिरीक्षक राज्य गुप्तवार्ता यांना पोलीस सेवेचे राष्ट्रपती पदक दोन वेळा मिळाले त्याबद्दल त्यांच त्याचप्रमाणे स्वप्निल डोमाडे यांनी देखील एस्टोनिया युरोप येथील जागतिक शॉर्ट फिल्म स्पर्धेत सिनेमॅटोग्राफर म्हणून लागोपाठ दोन वेळा प्रथम क्रमांक मिळवून ईस्टनियाचे पंतप्रधान यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर प्रमोद हिंदुराव, माजी आमदार नरेंद्र पवार, जगन्नाथ शिंदे, कल्याण शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील, माजी नगरसेवक मोहन उगले. उद्योजक उदय घुगे असे अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष शंकरराव आव्हाड, सूत्रसंचालन सुधीर चित्ते तर आभार प्रदर्शन आत्माराम फड यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता लता पालवे, वंदना सानप, अश्विनी डोमाडे, सारिका घुगे, चंद्रकला दराडे, सिमरन दराडे, संग्राम घुगे, सचिन दराडे, सुभाष घुगे, हेमंत दरगोडे, अशोक घुगे, वसंत आव्हाड, आदींनी विशेष परिश्रम घेतले.