महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
राजकीय

ठाणेकर निवडणुकीत योग्य धडा शिकवतील -खा.राजन विचारे

नेशन न्यूज मराठी टीम.

ठाणे/प्रतिनिधी – ठाणे-कळव्यात युवा सेनेच्या राज्य समन्व्यक अयोध्या पौळ यांच्याबाबत कुंभाड रचले गेले होते. त्यातून त्यांच्यावर शाईफेकण्याचा प्रकार घडला. तसेच पोलीस ठाण्याच्या आवारात मारहाण करण्यात आली. राज्यात सर्वत्र जाती धर्मांमध्ये तेढ निर्माण करून दंगल भडकविण्याचा प्रकार सुरु आहे. असा आरोपही यावेळी राजन विचारे यांनी या पत्रकार परिषदेत केला.

राज्यात केवळ खोटे गुन्हे दाखल केले जात आहे. पण दुसरीकडे वर्षभरात मारहाण झाल्यावरही गुन्हे दाखल करण्याची हिम्मत ठाणे पोलीस दाखवत नाहीत. असे ही राजन विचारे यांनी सांगितले. अयोध्या पौळ यांना कळवा पोलीस ठाण्याच्या आवारात मारहाण झाली. पण त्यानंतर ही कोणावर कारवाई झाली नाही. असा आरोप विचारे यांनी केला. मात्र, हा सर्व प्रकार ठाणेकर उघड्या डोळ्याने बघत आहे. ते निवडणुकीत योग्य धडा शिकवतील.असा इशारा सत्ताधार्याना विचारे यांनी दिला.

दिव्यात विजेचा शॉक लागून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. पण या घटनेत ही गुन्हा दाखल केला नाही. हे सर्व जनता बघत आहे. ते निवडणुकीत योग्य निर्णय घेतील. राज्याचे मुख्यमंत्री केवळ फोडाफोडीचे राजकारण करत आहेत. पण त्यांच्या ठाण्यातच कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही. पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली आहे. सत्ता कोणाचीही असो कायदा सुव्यवस्था राखणे पोलिसांचे काम आहे. असे ही राजन विचारे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×