नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
ठाणे/प्रतिनिधी – भारतीयांमध्ये क्रिकेट या खेळाचे भरपूर आकर्षण पाहायला मिळते. लहानापासून ते मोठ्यांपर्यंत गल्लोगल्ली खेळला जाणार हा खेळ अत्यंत लोकप्रिय आहे. भारतात सध्या आयपीएल चे सामने सुरू आहेत. त्यामुळे झटपट श्रीमंत होण्यासाठी बरेच लोक आयपीएल मॅच वर लाखों, करोडों रुपयांचा सट्टा लावत आहेत. सट्टा लावणे हा गुन्हा असल्याचे माहिती असून सुद्धा पैसे कमावण्याच्या हेतूने लोक सट्टा लावतात.
आरसीबी व सनरायजर्स हैद्राबाद यांच्यामधील टी 20 आयपीएल मॅचवर सट्टा लावणाऱ्या छत्तीसगड मधील त्रिकुटाला अटक केली गेली आहे. खंडणी विरोधी पथकास मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी सापळा रचून भिवंडीतील हॉटेल के.एन.पार्क,येथे छत्तीसगड येथे पोलिसांनी छापा टाकला. शानू बेरीवाल (30), रजत शर्मा (30) आणि विजय देवगन (40) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून 12 मोबाईल,1 फोन ,1 लॅपटॉप आणि टॅब असे एकूण 1 लाख 97 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी छत्तीसगड येथून आयपीएल मॅचवर ते सट्टा लावत होते. विशेष बाब म्हणजे आरोपींनी लॅपटॉप मध्ये सट्टा खेळणाऱ्या व्यक्तीकडून माहिती भरून घेतली होती. तसेच त्यांनी आरसीबी व सनरायजर्स हैद्राबाद यांच्यामधील टी 20 मॅच लाईव्ह बघून, सट्टा लावणाऱ्या इतर जणांकडून 11 लाख 86 हजार 811 रुपयांचा सट्टा स्विकारला होता. मोबाईल मध्ये फरार सट्टेबाज जानू यांची 19 नंबरची बुकीची बेटींग लाईन घेवून तिच्यावर 07 लाख 03 हजार रुपयांचा सट्टा लावला होता. शासनाची व मोबाईल कंपन्यांची दिशाभूल करण्यासाठी आरोपींनी बनावट कागदपत्राच्या आधारे सिमकार्डचा वापर केला.
याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून,आरोपींच्या फरार साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही कारवाई विशेष कार्य दल, गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकातील पोलीस निरीक्षक वनिता पाटील, यांच्या पथकाने केली .