नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
ठाणे/प्रतिनिधी – ठाणे पोलीस आयुक्तलयाच्या हद्दीतील भिवंडी परिसरात वाढत्या सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी वरिष्ठांच्या आदेशानुसार गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने धडक मोहीम राबवून इराणी टोळीतील सराईत सोनसाखळी चोर अब्बास शब्बर जाफरी वय २३ याला सापळा रचून अटक केली आहे.
त्याची अधिक चौकशी केली असता तब्बल १९ गुन्ह्यांची कबुली आरोपीने दिली आहे. त्याच्याकडून २३ लाख ८९ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ठाणे गुन्हे शाखा युनिट-२ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी भिवंडीच्या शांतीनगर परिसरात सापळा रचून इराणी टोळीतील सराईत आरोपीस अटक करण्यात आली आहे. अटक आरोपी अब्बास शब्बर जाफरी याच्यावर विविध पोलीस ठाण्यात १९ गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास पोलिस करत आहे.