नेशन न्यूज मराठी टीम.
ठाणे/प्रतिनिधी – आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्ताने अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालय, भारत सरकार व महाराष्ट्र शासन, कृषी विभाग, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय “मिलेट महोत्सव” गुरुवार, दि.5 ऑक्टोबर 2023 रोजी मिनी थिएटर, डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, येथे सकाळी 10.30 ते संध्याकाळी 07.00 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे. तरी या मिलेट महोत्सवास जास्तीत जास्त नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक कुटे यांनी केले आहे.
या मिलेट महोत्सवाचे उद्घाटन अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालय, भारत सरकार च्या सचिव, श्रीमती अनिता प्रवीण (भा.प्र.से.) व कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार (भा.प्र.से.) यांच्या हस्ते होणार असून यावेळी कृषी आयुक्त सुनील चव्हाण (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी अशोक शिनगारे (भा.प्र.से.), कृषी आयुक्तालयाचे संचालक (कृषी प्रक्रिया व नियोजन) श्री.सुभाष नागरे व विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या कार्यक्रमात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना कार्यशाळा, मिलेट पाककृती स्पर्धा, मिलेट पोषण व आरोग्य माहिती, मिळत खरेदीदार व विक्रेते संमेलन त्याचप्रमाणे मिलेट व मिलेट पदार्थांचे प्रदर्शन- विक्री हे विशेष कार्यक्रम होणार आहेत.
तरी या मिलेट महोत्सवास जास्तीत जास्त नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक कुटे यांनी केले आहे.