नेशन न्यूज मराठी टीम.
ठाणे / प्रतिनिधी – जालना येथील मनोज दरांगे पाटील यांचे मराठा समाज आरक्षण आंदोलन चांगलेच गाजले आहे. आंदोलनकर्त्यावर झालेला लाठीचार्ज नंतर या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सर्वत्र सरकारच्या भूमिकेचा निषेध व्यक्त केला जात आहे. ह्याचे पडसाद ठाणे येथे देखील पाहायला मिळत आहे.
सकल मराठा समाजाच्या वतीने ठाणे बंदची हाक पुकारण्यात आली असल्याकारणाने ठाणे शहरांमध्ये ठाणे रेल्वे स्टेशन नितीन कंपनी, तीन हात नाका तसेच मुख्यमंत्री यांचे निवासस्थान या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व ठिकाणी क़डक बंदोबस्त करण्यात आले आहेत. या दरम्यान काही अनुचित घडू नये यासाठी प्रयत्न सुरु आहेत.