नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
ठाणे/प्रतिनिधी – लोकसभा निवडणुक २०२४ से अनुषंगाने ठाणे पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे चालु राहणार नाहीत, तसेच पाहिजे फरारी आरोपी पकडण्याबाबत पोलीस आयुक्त ठाणे शहर यांनी आदेश दिलेले आहेत. त्या अनुषंगाने सर्व अधिकारी व अंमलदार वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे कार्यवाही करत आहेत.
त्या अनुषंगाने कारवाई करत असताना अरविंद शेजवळ पोलिस शिपाई खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा ठाणे शहर यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत प्रतिबंधीत गुटखा मालाची मोठ्या प्रमाणात साठवणूक करून वाहतूक करण्याची बातमी मिळाली. त्या नुसार छापा कारवाईत राजलक्ष्मी कंपाउंड, एम गोडावुन लगत असलेल्या सार्वजनिक रोडवर, काल्हेर, भिवंडी येथे शरीफसाव अब्दुलगौस सावनुर, इसाकअहमद यांचे जवळ महारष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा, पान मसाला, तंबाखु जर्दा असा एकूण ४०,८०,०००/- रूपये किमतीचा माल तसेच त्यांचे ताब्यातील आयशर कंटेनरसह एकूण ५५,९०,०००/- रू किमतीचा मुद्देमाल आढळून आला.लागलीच या दोन जणांना अटक करून त्यांच्या वर नारपोली पोलिस स्थानकात विविध कलमा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास खंडणी विरोधी पथक करित आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त, ठाणे शहर आशुतोष डुबरे, पोलीस सह आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पंजाबराव उगले, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, शिवराज पाटील, सहायक पोलीस आयुक्त, शोध २. गुन्हे शाखा, इंद्रजित कालें, सहायक पोलीस आयुक्त, विशेष कार्य दल, गुन्हे शाखा, शेखर वागडे यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकातील सपोनि/श्रीकृष्ण गोरे, सपोनि /भुषण कापडणीस, सपोनि/सुनिल तारमळे, पोउनि / विजयकुमार राठोड, सपोउनि/सुभाष तावडे, सपोडनि/कल्याण ढोकणे, सपोउनि संजय बावर, पोहवा/सचिन शिंपी, पोहवा/योगीराज कानडे, पोहवा/संदिप भोसले, पोहवा/संजय राठोड, पोहवा/गणेश गुरसाळी पोशि/तानाजी पाटील, पोशि/अरविंद शेजवळ, मपोहवा/शितल पावसकर, चापोना/भगवान हिवरे यांनी केली आहे.