DESK MARATHI NEWS ONLINE.
नाशिक / प्रतिनिधी – महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पाऊस झाल्याने पूरसदृश्य परिस्थिती असल्याने बचाव कार्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले होते. मात्र काही ठिकाणी अजूनही कोरडा दुष्काळ असल्याचे दिसून येत आहे. अन खरीप पिकांची पेरणी करून शेतकरी आभाळाकडे डोळे करून बसलेला पाहायला दिसतोय.नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील शेतकरी अशा परिस्थितीशी झगडत आहे.
यंदाचा पावसाळा पूर्णपणे कोरडा गेला असून खरीपाचे पीक पूर्णपणे शेतकऱ्यांच्या हातून गेले आहे. येवला तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, सक्तीची कर्ज वसुली थांबवावी, कांद्याचे अनुदान त्वरित जमा करावे, चारा छावण्या चालू करण्यात याव्यात, टँकरने पाणीपुरवठा चालू करावा यासह विविध मागण्यांसाठी येवला-नांदगाव रोडवरील राजापूर गावात उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक व शेतकऱ्यांनी संतप्त होत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी कर्ज वसुलीच्या नोटिसीची होळी देखील करण्यात आली.