महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
ताज्या घडामोडी पोलिस टाइम्स

१५ लाखांची लाच घेताना तहसीलदाराला रंगेहाथ अटक

नेशन न्यूज मराठी टीम.

नाशिक/प्रतिनिधी – नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. तहसीलदार या पदावर कार्यरत असलेले नरेश कुमार बहिरम यांना १५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आले. नाशिक शहरातील बहिरम यांच्या कर्मयोगी नगर येथील निवासस्थाना जवळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत अटक केली.

गौण खनिज प्रकरणातील दंडाची रक्कम कमी करण्यासाठी बहिरम यांनी लाच मागितल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून देण्यात आली. नाशिक तालुक्यातील राजुर बहुला येथील एका जमिनीतून मुरूम उत्खननाचे प्रकरण समोर आले होते. त्याबाबत नियमानुसार पाचपट दंड आणि जागा मालकास जागा भाडे असे मिळून एकूण १ कोटी २५ लाख ६ हजार २२० रुपये इतका दंड ठोठवण्यात आला होता. मात्र या आदेशाविरुद्ध जमीन मालकाने उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अपील दाखल केल्याने हे प्रकरण पुन्हा एकदा चौकशीसाठी तहसीलदार बहिरम यांच्याकडे पाठवण्यात आले होते. याबाबत जागेची पडताळणी करण्यासाठी तहसीलदार नरेशकुमार बहिरम हे राजुर बाहुला येथील तक्रारदारांच्या जमिनीवर गेले. त्या ठिकाणी त्यांनी याप्रकरणी तडजोड करण्यासाठी आणि दंडाची रक्कम कमी करण्यासाठी १५ लाख रुपये लाचेची मागणी केली होती. ही रक्कम स्वीकारताना बहिरम यांना रंगेहाथ अटक करण्यात आली. अशी माहिती शर्मिष्ठा वालावलकर, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक यांनी दिल्ली आहे,पुढील तपास सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×