नेशन न्यूज मराठी टीम.
रत्नागिरी/प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ रत्नागिरी तर्फे राज्य शासनाच्या खासगी करणा विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला. यावेळी शिक्षकांकडून काही प्रमुख मागण्यांसाठी घोषणा देण्यात आल्या.शासनाने या मागण्या मान्य न केल्यास भविष्यात मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिक्षक संघातर्फे देण्यात आला. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ रत्नागिरी तर्फे निवेदन सादर करण्यात आले.यावेळी हजारोच्या संख्येने शिक्षक रस्त्यावर उतरले होते.
शिक्षक व सर्व कर्मचारी यांना तात्काळ जुनी पेन्शन योजना लागू करणे, दत्तक शाळा योजना तात्काळ रद्द करणे कंत्राटीकरणाचा शासन आदेश रद्द करणे, कमी पटाच्या शाळा एकत्रिकरण करण्याचा शासन आदेश रद्द करणे, शिक्षकांकडील सर्व अशैक्षणिक कामे तात्काळ रद्द करणे, ऑनलाइन माहितीचा भडीमार तात्काळ थांबविणे शिक्षकांना पूर्ण वेळ शाळेत थांबून शिकवायला देणे,शिक्षण विभागाला आवश्यक ते अनुदान तात्काळ देणे, शिक्षकांची मुख्यालयाची अट रद्द करणे MS-CIT ची अट रद्द करणे दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या सहाय्यक उपकरणांसाठी आवश्यक अनुदान मंजूर करणे सर्व प्रकारची पदोन्नती तात्काळ पूर्ण करणे शिक्षकांकडील पोषण आहारची जबाबदारी अन्य यंत्रणेकडे देणे, B L O चे काम कायमचे शिक्षकांकडून काढून घेणे यावेळी अशा विविध मागण्या प्रशासनासमोर संघाच्यावतीने मांडण्यात आल्या.