नेशन न्यूज मराठी टीम.
सोलापूर / प्रतिनिधी – शिक्षकांना सर्वत्र शाळाबाह्य कामे दिली गेल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. देशाची भावी पिढी घडवणाऱ्या शिक्षकांना अशैक्षणिक कामात गुंतावल्याने, शिक्षकांनी घोषणाबाजी करत आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला महामोर्चाद्वारे सोलापुरात वाचा फोडली. शाळाबाह्य अशैक्षणिक कामे बंद करा व “आम्हाला फक्त शिकवु दया” ची आर्त मागणी करिता महाराष्ट्र राज्य प्राथ. शिक्षक संघाचे नेते संभाजी थोरात यांच्या आदेशानुसार राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्यभर शिक्षक संघाच्या वतीने आक्रोश महामोर्चा काढण्यात आला. याचाच भाग म्हणून जिल्हा शिक्षक संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर सुमारे 4000 शिक्षकांचा आक्रोश मोर्चा काढला.
बंद करा बंद करा ..अशैक्षणिक कामे बंद करा, बंद करा बंद करा… खाजगीकरण बंद करा, आम्हाला फक्त शिकवु द्या…सरकारी शाळा टिकू द्या, संयुक्त शाळा योजना…बंद झालीच पाहिजे, शाळाबाह्य कामे काढून घ्या..आम्हाला फक्त शिकवू द्या, शिक्षण हक्क कायद्याचा…विजय असो अशा घोषणा देत. या मोर्चाची सुरुवात चार पुतळा (हुतात्मा चौक) येथून झाली. बाबासाहेब आंबेडकर चौक – सिध्देश्वर प्रशाला समोरून मोर्चा निघत जिल्हा परिषद पूनम गेट येथे त्याचे रूपांतर सभेत झाली. या सभास्थळी राज्य शिक्षक संघाचे कार्यकारी अध्यक्ष म.ज. मोरे, जिल्हा संघाचे नेते बब्रुवाहन काशीद, राज्य सल्लागार मंडळाचे अध्यक्ष ल. हु. कांबळे, राज्य सरचिटणीस संजय चेळेकर, जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध पवार, सरचिटणीस सूर्यकांत हत्तूरे (डोगे), कार्यकारी अध्यक्ष रणजीत थिटे, कार्याध्यक्ष दिलीप ताटे, कोषाध्यक्ष महादेव जठार, चंदाराणी आतकर आदींची भाषणे झाली.
या मोर्चेत माजी आमदार दिलीप माने यांनी सहभागी होऊन शिक्षकांच्या मागण्यांचे जोरदार समर्थन केले. मोर्चाला जुनी पेन्शन हक्क संघटना, एकल शिक्षक संघटना, सांगोला तालुका आदर्श शिक्षक समिती, शिवाजीराव पाटील गट शिक्षक संघ, विश्वगामी अधिकारी व कर्मचारी संघटना, अल्पसंख्यांक अधिकारी व कर्मचारी संघटना, शिक्षक सहकार संघटना, कुळूर कैकाडी समाज संघटना, मराठा क्रांती मोर्चा विठ्ठल शुगरचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी उपस्थळी उपोषण स्थळी भेट देऊन संयुक्त शाळा योजना, शाळांचे खाजगीकरण, कॉन्ट्रॅक्ट बेसवर शिक्षकांची नियुक्ती आदी शासनाच्या योजना जनता मान्य करणार नसल्याचे सांगितले.
त्याचप्रमाणे शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले यांनी उपोषण स्थळी भेट देऊन शिक्षकांच्या राज्यस्तरावरील प्रश्न शासनास कळवून जिल्हास्तरावरील प्रश्न लवकरच मार्गी लावणार असल्याचे सांगितले.या मोर्चात माजी आमदार दिलीप माने यांनी सहभागी होऊन शिक्षकांच्या मागण्यांचे जोरदार समर्थन केले. मोर्चाला जुनी पेन्शन हक्क संघटना, एकल शिक्षक संघटना, सांगोला तालुका आदर्श शिक्षक समिती, शिवाजीराव पाटील गट शिक्षक संघ, विश्वगामी अधिकारी व कर्मचारी संघटना, अल्पसंख्यांक अधिकारी व कर्मचारी संघटना, शिक्षक सहकार संघटना, कुळूर कैकाडी समाज संघटना, मराठा क्रांती मोर्चा विठ्ठल शुगरचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी उपस्थळी उपोषण स्थळी भेट देऊन संयुक्त शाळा योजना, शाळांचे खाजगीकरण, कॉन्ट्रॅक्ट बेसवर शिक्षकांची नियुक्ती आदी शासनाच्या योजना जनता मान्य करणार नसल्याचे सांगितले.