नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई – महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने सहा महिने विभागास गुंगारा देत फिरत असलेल्या जोडप्यास गुजरातमधील सुरत येथून गुरुवार, दि. 10 फेब्रुवारी, 2022 रोजी दुपारी अटक केली. त्यांच्याकडून 450 कोटींहून अधिक रकमेची बोगस बिले जप्त करण्यात आली आहेत.
मुंबई पोलिसांची आणि सुरत शहर पोलिसांची गुन्हा अन्वेषण शाखा यांच्या भरीव सहकार्यामुळे हे अभियान अथक परिश्रमांनंतर दोन दिवसाअखेरीस यशस्वीरित्या पूर्ण झाले.
मे. डॉल्फिन ओव्हरसीज [प्रोप्रायटरः श्रीमती प्रिमा म्हात्रे] आणि मे.प्राईम ओव्हरसीन [प्रोप्रायटरः श्री. संजीव सिंग] या दोन कंपन्यांनी करचुकवेगिरी केल्याची गुप्त माहिती व्यापक सर्वसमावेशक विश्लेषण प्रणालीद्वारे अन्वेषण शाखेकडे प्राप्त झाली. माहे ऑगस्ट 2021 मध्ये महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी या कंपन्यांवर छापे टाकले असता पहिल्या दिवसापासून या दोन्ही कंपन्यांचे संचालक वैद्यकीय कारण देऊन अन्वेषणासाठी गैरहजर राहिले व त्यानंतर ते फरार झाले. विभागाच्या कोणत्याही नोटीसांना न जुमानता हे जोडपे महाराष्ट्र राज्याबाहेर पळून गेले. या जोडप्याने इतर व्यक्तिंच्या नावे बोगस कंपन्या काढून त्याद्वारे साधारण रुपये 482 कोटी इतक्या रकमेची बोगस बिले प्राप्त करून रु. 111 कोटी इतक्या प्रचंड मोठ्या रकमेची करचुकवेगिरी केल्याचे तपासात दिसून आले.
प्रकरणाचे गांभीर्य पाहता महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने मुंबई पोलिसांच्या विशेष व सातत्यपूर्ण मदतीने व माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन या जोडप्याचा ठावठिकाणा शोधून काढला.
महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाचे व मुंबई पोलिसांचे पथक तात्काळ रात्रीच पुढील कार्यवाहीसाठी सुरतला रवाना झाले. सुरत शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अत्यंत भरीव मदतीने व मुंबई पोलीस दलातील माहिम पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने या जोडप्याला सुरत येथे त्यांनी भाड्याने घेतलेल्या आलिशान फ्लॅटमधून ताब्यात घेतले गेले. सुरत येथून मुंबई पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने या जोडप्यास शुक्रवारी पहाटे मुंबई येथे आणले गेले.
मुंबई येथे न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपीना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या संपूर्ण कार्यवाहीचे नियोजन व अंमलबजावणी राज्यकर सहआयुक्त (अन्वेषण-ब) श्रीमती संपदा मेहता, राज्य कर उपायुक्त विनोद देसाई, सहायक राज्य कर आयुक्त ऋषिकेश वाघ, राज्य कर अधिकारी श्रीमती स्वाती शिंदे व त्यांच्या सहकार्यांनी पार पाडली.
महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवाकर विभागाने परराज्यातून व इतक्या मोठ्या घोटाळ्यातील आरोपीस अटक करण्याची ही विभागाच्या इतिहासातील पाहिलीच वेळ आहे.
करचुकवेगिरी करणाऱ्या व्यक्तिंना या घटनेमुळे जरब बसली असून, महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभाग, पोलीस प्रशासनाच्या सक्षम सहकार्याने धडक कारवाई भविष्यातही अशीच चालू ठेवेल, असा चोख संदेश करदात्यांस देण्यासही विभाग यशस्वी ठरला आहे.
Related Posts
-
२७ कोटींहून अधिक रकमेच्या बोगस कर परताव्यासंदर्भात एकास अटक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - शासनाच्या वस्तू व सेवाकर विभागाकडून…
-
वाढीव कर वाढीच्या विरोधात कॉंग्रेसचे चक्का जाम आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - महाराष्ट्रात आपल्या…
-
राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या प्रशिक्षण सत्राचे उद्घाटन
नेशन न्यूज़ मराठी ऑनलाइन टिम. नागपूर/प्रतिनिधी - कृत्रिम बुध्दिमत्ता व इतर…
-
एमपीएससीच्या राज्य कर निरीक्षक मुख्य परीक्षा २०१९चा निकाल जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य…
-
बोगस क्रीडा प्रमाणपत्र धारक उमेदवारांना प्रमाणपत्र समर्पणाबाबत आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - खेळाडूंना शासकीय निमशासकीय सेवेत…
-
युक्रेन येथून घरी परतलेल्या विद्यार्थ्याची जिल्हाधिकारी यांनी घेतली भेट
नेशन न्यूज मराठी टीम. बीड -युक्रेन आणि रशिया युद्ध सुरू…
-
पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी कर आणखी कमी करायाला हवा -मुख्यमंत्री
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी…
-
खाजगी कंपनीच्या संचालकाला १६२ कोटी रुपयांच्या बोगस देयकाप्रकरणी अटक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - करचुकवेगिरी करुन शासकीय महसूल बुडविणाऱ्या…
-
करचुकवेगिरी प्रकरणी मुंबईत जीएसटी विभागाची कारवाई,एकाला अटक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - 40.95 कोटी रुपयांच्या बनावट…
-
१८ कोटीच्या कर चोरी प्रकरणी एका व्यक्तीला अटक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - बनावट देयक देणाऱ्या करदात्यांसंदर्भात महाराष्ट्र…
-
५५ कोटीच्या बोगस पावत्या प्रकरणी दोन जणांना अटक
नेशन न्यूज मराठी टीम. भिवंडी - केंद्रीय वस्तू आणि सेवा…
-
जीएसटीची बोगस विक्री देयके तयार केल्याप्रकरणी आणखी एकास अटक
मुंबई/प्रतिनिधी - वस्तू व सेवा कराची (जीएसटी) बोगस विक्री देयके तयार…
-
निर्यात उत्पादन शुल्क आणि कर सवलत ३० जून २०२४ पर्यंत
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - …
-
कल्याणात रेल्वे प्रवासासाठी बोगस ओळखपत्र बनवून देणारा पोलिसाच्या जाळ्यात
कल्याण /प्रतिनिधी- कल्याण मध्ये रेल्वे प्रवासासाठी बोगस ओळखपत्र देणाऱ्याला पोलिसांनी…
-
२,२१५ कोटीच्या बोगस बिलांप्रकरणी सूत्रधारास अटक,जीएसटी विभागाची कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व…
-
सुरत आंतरराष्ट्रीय विमानतळावर डीआरआय २५ कोटी रुपयांचे सोने केले जप्त
नेशन न्यूज मराठी टीम. सुरत/प्रतिनिधी - ऑपरेशन गोल्डमाइन अंतर्गत महसूल…
-
कोरोना काळातही केडीएमसीच्या तिजोरीत विक्रमी ४२७ कोटी कर भरणा
कल्याण प्रतिनिधी- कल्याण डोंबिवली महापालिकेच्या तिजोरीत यंदा विक्रमी कर भरणा…
-
कल्याण मध्ये कोरोना टेस्टच्या नावाने प्रवाशांना लुबाडणारा बोगस टीसी गजाआड
कल्याण/प्रतिनिधी - कोरोना टेस्टच्या नावाखाली रेल्वे प्रवाशांना लुबाडणाऱ्या बोगस टीसीला रेल्वे…
-
वस्तू व सेवाकर बोगस विक्री बिले निर्गमित प्रकरणी न्यायालयीन कोठडीस मुदतवाढ
प्रतिनिधी. मुंबई - महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने 23 नोव्हेंबर…
-
ओप्पो इंडिया कंपनीची ४३८९ कोटीची कर चोरी उघड
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - डीआरआय अर्थात केंद्रीय…
-
खोटी बिले देऊन शासनाची करोडो रूपयांची कर चुकवेगिरी करणाऱ्या एकाला अटक
नेशन नुज मराठी टीम. मुंबई - खोटी बिले देऊन शासनाची…
-
५८ कोटी रुपयांची बनावट उलाढाल दाखवून कर चुकविल्याप्रकरणी एकास अटक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - खोटी बिले देऊन शासनाची…
-
खेळ, कोडी,कॉमिक्सच्या माध्यमातून मुलांमध्ये कर साक्षरता पसरवण्याचा आयकर विभागाचा उपक्रम
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. मुंबई - CBDT अर्थात केंद्रीय प्रत्यक्ष…
-
महसुली कर व करेतर रक्कम भरा,आता एका क्लिकवर
प्रतिनिधी मुंबई - महसुली कर व करेतर रक्कम भरणा करण्याची…
-
८६.६० कोटींच्या बनावट इनव्हॉइस प्रकरणी कर सल्लागाराला बेड्या
नेशन मराठी ऑनलाइन टिम. मुंबई/प्रतिनिधी - मालेगाव शहरातील कापड व्यवसायातील…
-
२७ गावांची कर आकारणी नवी मुंबई महापालिकेच्या धोरणाप्रमाणे करा - आमदार राजू पाटील
नेशन न्युज मराठी टीम. कल्याण - नवी मुंबईतील काही गावांमध्ये…
-
अन्यथा २७ गाव आणि पलावा मधील नागरिक कर भरणार नाहीत - आमदार राजू पाटिल
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण ग्रामीण/संघर्ष गांगुर्डे- कल्याण डोंबिवली महापालिका…
-
कोविड संकटातही केडीएमसीच्या तिजोरी मध्ये १५० दिवसांत तब्बल १६० कोटींचा कर जमा
कल्याण/प्रतिनिधी - एकीकडे कोरोनामुळे अनेकांची आर्थिक घडी विस्कटली असली तरी…
-
१०० कोटीची कर चुकवेगिरी उघड,मुंबई जीएसटी आयुक्तालयाची कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - मुंबई क्षेत्राच्या केंद्रीय जीएसटी…
-
बोगस हटाव आदिवासी बचाव, नागपूर अधिवेशनात आ. विनोद निकोले यांची जोरदार घोषणाबाजी
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/d2RJBbORfH8 नागपूर / डहाणू. (प्रतिनिधी) –…
-
वस्तू व सेवा कर कर्मचारी सहकारी पतपेढीच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधी साठी सव्वा लाख
प्रतिनिधी. मुंबई - कोरोना’च्या लढ्यासाठी वस्तू व सेवा कर कर्मचारी…
-
१९.५१ कोटीची कर फसवणुक, सीजीएसटी विभागाने कंपनीच्या संचालकाला केली अटक
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई - मेसर्स ओमनिपोटंट इंडस्ट्रीज…
-
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात १५ ते ३१ मार्च पर्येंत विशेष मालमत्ता कर अभय योजना
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई - मालमत्ताकर हा नवी…
-
मुंबईकरांसाठी गोड बातमी,५०० चौ. फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांसाठी…
-
मुंबईत सुरत आणि 'उदयगिरी' या दोन स्वदेशी बनावटीच्या युद्धनौकांचे जलावतरण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - स्वदेशी युद्धनौका निर्मितीच्या इतिहासात…