कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कोविड रूग्णांची संख्या कमी झाल्यामुळे महानगरपालिकेने टाटा आमंत्रा येथील कोविड सेंटर बंद करायचा निर्णय घेतला, त्यामुळे टाटा आमंत्रात दिड वर्ष सेवा देण्या-या डॉक्टर्स, नर्सेस, वॉडबॉय इ. कर्मचारी वर्गासाठी छोटेखानी समारंभकेला आयोजित केला होता . टाटा आमंत्रा बंद करणे म्हणजे तिसरी लाट येणार नाही, असा शुभ शकून मानायला हरकत नाही असा आशावाद महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यंवंशी यांनी व्यक्त केला.टाटा आमंत्राच्या निर्जिव इमारतींचा आत्मा म्हणजेच या इमारतीमध्ये कोविड रुग्णांसाठी काम करणारा सर्व कर्मचारी वर्ग. या कर्मचारी वर्गाने लोकांच्या मनामनात घर निर्माण केले आणि हे चांगली सेवा दिल्याशिवाय घडत नाही. येथील कर्मचारी वर्गाने अत्यंत कठिण परिस्थितीत काम केले. कोविडच्या पहिल्या लाटेत स्वत:च्या मनातील भितीवर मात करुन, कोविड रुग्णांच्या मनातील भिती घालवून एक कुटूंब म्हणून काम केले, हे निश्चितच खुप कौतुकास्पद आहे अशा शब्दात तेथे काम करणा-या कर्मचारी वर्गाचे आणि दिड वर्ष सातत्याने तेथील कर्मचारी वर्गाबरोबर कार्यरत असलेल्या कार्यकारी अभियंता घन:श्याम नवांगुळ, प्रमोद मोरे, डॉ. दिपाली मोरे यांचेही आयुक्तांनी भरभरून कौतुक केले.टाटा आमंत्रा क्वॉरंटाईन सेंटर सध्या बंद केल्यामुळे तेथील कर्मचारी वर्गास वसंत व्हॅली आणि महापालिकेच्या इतर रुग्णालयांत पोस्टिंग दिले जाईल, असे आश्वासन आयुक्तांनी यावेळी दिले.

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी हे केवळ आयुक्तच नव्हे तर आपले फिलासॉफर, गाईड, फ्रेन्ड आहेत. त्यांच्या मुळेच आपण कोविडच्या पहिल्या व दुस-या लाटेला समर्थपणे तोंड देवू शकलो, असे उद्गार महापालिका अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी आपल्या भाषणात काढले. भिती न बाळगता काम केल्याबाबत टाटा आमंत्रातील कर्मचारी वर्गाचे आणि त्यांना काम करण्यासाठी पाठिंबा देणा-या त्यांच्या कुटूंबियांचे कौतुक देखील त्यांनी आपल्या भाषणात केले. आम्ही येथे निरोप समारंभासाठी आलेलो नसून कोविड कालावधित येथे काम केलेल्या कर्मचारी वर्गाचे आभार मानायला आलेलो आहोत, असेही पुढे ते म्हणाले.
कोविडच्या पहिल्या लाटेत टाटा आमंत्रा सुरु करतांना अनंत अडचणींना तोंड दयावे लागले, सुरुवातीला तेथे काहीही सुविधा नव्हत्या, काम करण्याकरीता येण्यास माणसे घाबरत होती. अशा परिस्थितीत अडचणीतून मार्ग काढत काम सुरु ठेवले आणि टाटा आमंत्रा हे महाराष्ट्रातील एक उत्तम क्वारंटाईन सेंटर म्हणून वाखाणले गेल्याची माहिती शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली यांनी यावेळी आपल्या भाषणात दिली.
टाटा आमंत्रामध्ये आतापर्यंत 40 हजार कोविड रुग्णांवर उपचार केले असल्याची माहिती कार्यकारी अभियंता घन:श्याम नवांगुळ यांनी आपल्या प्रास्ताविकात दिली. त्याचप्रमाणे टाटा आमंत्रात संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर उभे करण्यासाठी जलनि:सारण, पाणी पुरवठा, केटरिंग सुविधा पुरविण्यासाठी अनेकांचा मोलाचा हातभार लागला आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
यावेळीउपायुक्त रामदास कोकरे, उपायुक्त सुधाकर जगताप वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील, महापालिका सचिव संजय जाधव, साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. पानपाटील, डॉ. सरवणकर, कार्यकारी अभियंता सुभाष पाटील उपस्थित होते
Related Posts
-
नागपूर हज हाऊसमध्ये कोविड सेंटर होणार सुरु
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य हज समितीच्या अखत्यारित असलेल्या…
-
मुंबईच्या टाटा मेमोरियल सेंटर आणि रायपूरच्या वेदांत बाल्को मेडिकल सेंटर यांच्यात सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबईच्या टाटा मेमोरियल सेंटर…
-
भिवंडीतील शेलार ग्राम पंचायत उभारणार ५० खाटांचे कोविड सेंटर
भिवंडी/प्रतिनिधी - तालुक्यातील रुग्णसंख्या वाढत असल्याने नागरिकांना कोरोनावरील उपचारासाठी व बेड…
-
वाशी एक्सिबिशन सेंटर मध्ये कोविड रुग्णांसाठी सुविधा -महसूल आयुक्त शिवाजी दौंड
नवी मुंबई - वाशी एक्सिबिशन सेंटर येथे सुमारे 1200 बेड…
-
टाटा मेमोरियल सेंटर येथील आशा धर्मशाळेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई/प्रतिनिधी - आजपासून आपण राज्यातली मंदिरे उघडली आहेत. टाटा मेमोरियल…
-
भिवंडीतील शेलार ग्रामपंचायतीने उभारलेले कोविड सेंटर अडकले सरकारी लाल फितीत
भिवंडी/ प्रतिनिधी - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णालयातील बेड, ऑक्सीजन ,रेडिमेसिव्हर इंजेक्शन…
-
कोविड सेंटर मधील सफाई कर्मचाऱ्यांचा कामबंद करण्याचा इशारा,अस्थायी कामगाराची ठेकेदाराकडून पिळवणूक
कल्याण/ प्रतिनिधी - गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कोविड सेंटर मधील सफाई…
-
टाटा पॉवर उपकेंद्रात तातडीचे दुरुस्ती काम,कल्याण पूर्व व उल्हासनगरच्या काही भागात वीज राहणार बंद
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - नेतीवली येथील 132 केव्ही टाटा पॉवर उपकेंद्रात…
-
राधानगरी धरणाचा दरवाजा बंद करण्यात यश
नेशन न्युज मराठी टीम. कोल्हापूर- राधानगरी धरणाचा दरवाजा बंद करण्यात…
-
यंदाची दिवाळी कोविड योध्यांचा सन्मान करण्याची
प्रतिनिधी. कल्याण - कल्याण डोंबिवली मनपाच्या वतीने भिंवडी बायपास येथे…
-
टाटा औष्णिक वीजनिर्मिती केंद्राला ऊर्जामंत्री यांची भेट
प्रतिनिधी. मुंबई - मुंबईत दि. १२ ऑक्टोबर रोजी घडलेल्या वीजपुरवठा…
-
मेळघाटातील धाराकोटमध्ये कोविड प्रतिबंधक लसीकरण यशस्वी
अमरावती/प्रतिनिधी - लसीकरणाला सुरुवातीला नकार देणाऱ्या धाराकोटच्या नागरिकांना लसीकरणाचे महत्त्व पटवून…
-
केडीएमसीच्या कोविड रुग्णालयात महिला रुग्णाची सुखरुप प्रसुती
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आर्ट गॅलरी,कल्याण प. येथील कोविड…
-
मुख्यमंत्र्याचे शिष्टमंडळाला निमंत्रण तूर्तास शिर्डी बंद मागे
शिर्डी - साईबाबा यांच्या जन्मस्थळावरून सुरू असलेला वाद आता संपण्याची…
-
जालना घटनेचे पडसाद संगमनेरात ,संगमनेर आगार बंद
नेशन न्यूज मराठी टीम. जालना / प्रतिनिधी - जालना जिल्ह्यातील…
-
कांद्याचे लिलाव सलग तीन दिवसांपासून बंद
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक / प्रतिनिधी - केंद्राकडून कांद्याच्या…
-
कोविड पार्श्वभूमीवर कलाकारांना ३१ मार्च २०२३ पर्यंत अर्थसहाय्य
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - कोविड पार्श्वभूमीवर कलाकारांना देण्यात…
-
पंढरपूरात होणार अतिरिक्त १२० बेडचे कोविड हॉस्पिटल
पंढरपूर/प्रतिनिधी - वाढत्या कोरोनाचा प्राधुर्भाव रोखण्यासाठी व कोविडच्या रुग्णांना वेळेत…
-
केंद्र सरकारचा कोविड-१९ इन्होवेशन पुरस्कार केडीएमसीला
कल्याण//संघर्ष गांगुर्डे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला भारत सरकारचा कोविड-19 इन्होवेशन पुरस्कार मिळाला आहे.…
-
कोविड रुग्णांच्या मदतीसाठी रात्रीच्या वेळी आता केडीएमसीची मध्यवर्ती वॉररुम
कल्याण/प्रतिनिधी - कोरोनाचा वाढता प्रभाव आणि रात्री - अपरात्री रुग्णांच्या नातेवाईकांची…
-
टाटा ग्रुपने जपला सामाजिक बंधिलकीचा वसा कोरोनासाठी १५०० कोटीची मदत.
प्रतिनिधी. मुंबई - कोरोना हे आता पर्येंतचे देशापुढील सर्वात मोठे…
-
केडीएमसी कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवलीतील कंत्राटी सफाई…
-
हॉलमार्क आयडेंटिफिकेशन सक्ती विरोधात जळगाव मध्ये सराफ व्यावसायिकांचा बंद
जळगाव/प्रतिनिधी- जळगावात सुवर्ण व्यवसायिकांच्या वतीने बंद पुकारण्यात आला. सुवर्ण अलंकार…
-
बालाजी आंगन कॉम्प्लेक्समध्ये साकारलंय टाटा मेमोरियल हॉस्पिटलचा देखावा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - कॅन्सर म्हणजेच कर्करोग या आजाराविषयी…
-
नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या बंद, शेतकऱ्यांना बसतोय फटका
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. https://youtu.be/mSO6ZmtLS2g?si=vpwnIEkbhWFX354u नाशिक/प्रतिनिधी - नाशिक मध्ये…
-
कोविड योद्धा पोलीस कर्मचाऱ्यांना जेनेरिक आधारच्या वतीने प्रथमोपचार किट वाटप
मुंबई /प्रतिनिधी - जगात कोविड १९ ने थैमान घातले आहे.…
-
शेलार ग्राम पंचायतीच्या कोविड सेंटरच्या मान्यतेसाठी सरपंच उपोषणाच्या तयारीत
भिवंडी/प्रतिनिधी - भिवंडीतील शेलार ग्रामपंचायतीच्या वतीने उभारलेल्या कोविड सेंटरला जिल्हाधिकारी कार्यालयाची…
-
कणकवली- कनेडी मल्हार पुलाचा काही भाग कोसळला,वाहतूक बंद
सिंधुदुर्ग/प्रतिनिधी – सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असणाऱ्या जोरदार पावसामुळे कणकवली –…
-
कोविड परिस्थिती नियंत्रणात; नागरिकांनी घाबरून जाऊ नये – मुख्यमंत्री
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर/प्रतिनिधी - जगातील कोरोनाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात…
-
मतदान बंद ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रशासन करेल का कारवाई?
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. यवतमाळ/प्रतिनिधी - जास्तीत जास्त मतदान…
-
पाणीपुरवठा बंद असल्याने लोकसभा निवडणुकीवर नागरिकांनी टाकला बहिष्कार
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नाशिक/प्रतिनिधी - महाराष्ट्राला निसर्गाची भरभरून…
-
मोहोळ येथे होणार लवकरच सुसज्ज कोविड केअर सेंटर
सोलापूर/प्रतिनिधी - वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी रुग्णाना योग्य उपचार मिळावे.त्यांच्या…
-
डोंबिवली रेल्वे स्थानकातील सरकता जिना बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. https://youtu.be/vTCHJOvq7mk?si=kGCbTtH4EgdZ8mlM कल्याण/प्रतिनिधी - सध्याच्या घडीला…
-
आता दिल्ली छावणी क्षेत्रात टाटा पॉवरचे इलेक्ट्रिक वाहनांचे चार्जिंग स्टेशन
नेशन न्युज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय लष्कराने आपल्या 'गो-ग्रीन…
-
कल्याण-डोंबिवली-उल्हासनगरमधील झोमॅटो रायडरचे काम बंद आंदोलन
कल्याण/प्रतिनिधी - खाद्यपदार्थ घरपोच देण्याच्या सेवेसाठी सुप्रसिद्ध असणाऱ्या झोमॅटो कंपनीच्या…
-
कोविड हा आजार होता, नंतर त्याचा बाजार केला - आमदार राजू पाटील
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली - डोंबिवली विभा कंपनीच्या जागेत…
-
जालना घटनेनंतर अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आलेली बस सेवा पूर्ववत
नेशन न्यूज मराठी टीम. संभाजीनगर / प्रतिनिधी - मराठा क्रांती…
-
मागण्या पूर्ण न झाल्यास दुग्धपुरवठा बंद करण्याचा आंदोलनकर्त्यांचा इशारा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. छ.संभाजीनगर/प्रतिनिधी - महाराष्ट्रातील शेतकऱ्याला अजूनही…
-
देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी कल्याण पश्चिमेच्या काही भागात उद्या वीज बंद
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - वीज वितरण यंत्रणेच्या नियोजित…
-
उद्या डोंबिवली व कल्याण पूर्वच्या काही भागात वीज बंद
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - वीज वितरण यंत्रणेच्या नियोजित…
-
केडीएमसीच्या कोविड सेंटरचा शिवसेना खासदार,भाजपा आमदार यांचा पाहणी दौरा
नेशन न्युज मराठी टीम. डोंबिवली - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता…