नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
रायगड/प्रतिनिधी – टाटा हॉस्पिटल आणि आयआयटी मुंबईने एकत्र येत ब्लड कॅन्सरवर उपयुक्त ठरणाऱ्या प्रणालीचा शोध लावला आहे. संशोधकांनी दावा केला आहे की पूर्वीच्या उपचार पद्धती पेक्षा ही नवी प्रणाली उपयुक्त ठरणार आहे. या पूर्णतः स्वदेशी नव्या प्रणालीचे नाव कार-टी असून ही लहान मुलांवर 99 टक्क्यानपर्यंत उपयुक्त आहे, तर मोठ्यांवर देखील चांगला परिणाम करते. ही नवीन प्रणाली दोन टप्प्यात पूर्ण करण्यात आली असून यामध्ये 100 रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत ज्याचे सकारात्मक परिणाम पहायला मिळाले.
देशातील 30 प्रमुख रुग्णालयात ब्लड कॅन्सर वरील ही नवीन उपचार पद्धती उपलब्ध असून यामध्ये मुख्यत: ब्लड कॅन्सर वरील उपचार करण्यात येतो. आतापर्यंत अमेरिका आणि युरोप मधील काही देशातच ही प्रणाली कार्यरत होती जी प्रचंड खर्चिक होती. जिथे विदेशात या उपचार पद्धतीसाठी 3 ते 4 करोड रुपये खर्च होतात. तिथेच भारतात केवळ 50 लाखात या नवीन प्रणालीने उपचार घेणे शक्य होणार आहे. यामध्ये रुग्णाला कीमो थेरेपी प्रमाणे जास्त दुखणे सहन न करता कार-टी प्रणालीच्या एकाच डोसमध्ये पूर्ण उपचार संभव आहे. यासाठी 10 वर्ष संशोधन करावे लागले आहेत. आतापर्यंत भारतीय विदेशात जाऊन उपचार घ्यावे लागत होते मात्र आता विदेशी नागरिक उपचारासाठी भारतात येतील अशी प्रतिक्रिया टाटा रुग्णालयाचे डॉ. शिरीष आर्या यांनी दिली आहे.