नेशन न्युज मराठी टीम.
चाळीसगाव/प्रतिनिधी– राज्यात उभारण्यात येणारा ”वेदांता फॉक्सकॉन’ नावाचा प्रकल्प दुसऱ्या राज्यात जाणे म्हणजे चुकीचे आहे. आता सत्ताधाऱ्यांनी दुसरा प्रकल्प आणण्याचा गाजर दाखवत आहे. त्यामुळे गाजर दाखवू नका, प्रकल्प पुन्हा राज्यात आणा अशी मागणी करत विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी सरकारवर तोफ डागली. ते जळगाव दौऱ्यावर असताना चाळीसगावला माध्यमांशी संवाद साधतांना सांगितले आहे.
काल राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत डोंबिवली येथे आले असता वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पा बद्दल पत्रकारांनी विचारणा केली आसता त्यांनीही असे सागितले कि मुख्यमंत्री व पंतप्रधान यांची चर्चा झाली असून हा जरी प्रकल्प राज्याबाहेर गेला आसला तरी महाराष्ट्राला याच्या पेक्षा मोठा प्रकल्प देणार असल्याचे उद्योग मंत्र्यांनी सागितले,. याला सडेतोड उत्तर देत अजितदादा यांनी सागितले कि दुसरा प्रकल्प आणण्याचे सागणे म्हंजे हि दुसरी पळवाट असून काहीतरी गजर दाखविण्याचा प्रकार आहे.
ठाकरे सरकार असताना तळेगाव येथे वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प येण्याचे निश्चीत झाले होते. मात्र शिंदे-फडणवीस सरकार येताच अचानक सदर प्रकल्प दुसर्या राज्यात जाणे चुकीचे आहे. आता सत्ताधारी दुसरा प्रकल्प आणण्याबाबत केविलवाणी बाता करत आहेत. मात्र आधीच्या प्रकल्पासह नवीन प्रोजेक्ट राज्यात आणा अशी मागणी करत विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी जळगाव दौऱ्यावर असताना सरकारवर तोफ डागली. ते चाळीसगावला दाखल झाल्यानंतर ”न्युज नेशन मराठी’शी बोलत होते. यावेळी त्यांनी दोन लाख कोटींची गुंतवणूक राज्यात या प्रकल्पातून होणार होते. यामुळे दीड लाख बेरोजगारांना रोजगार होणार होता. मात्र अचानक दुसऱ्या राज्यात प्रकल्प गेल्याने अनेकांना रोजगारापासून मुकावे लागणार आहे. त्यामुळे हे प्रकार राजकीय दबावापोटी घडले असून प्रकल्प राज्यात पुन्हा आणण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहनही पवार यांनी केला आहे.