महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image राजकीय

पद्मश्री काढून घेऊन कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा – कल्याण काँग्रेसची मागणी

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – देशाबद्दल आणि महात्मा गांधींबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी पद्मश्री पुरस्कार काढून घेऊन कंगना राणावतवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात कल्याण शहर जिल्हा काँग्रेसतर्फे आज पोलीस उपायुक्तांना निवेदन देत ही मागणी करण्यात आली.

देशाला मिळालेले स्वातंत्र्य हे भीक म्हणुन मिळाले असल्याचे वादग्रस्त वक्तव्य कंगना राणावतने केले आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या क्रांतिवीर आणि महात्म्यांनी प्राणाची आहुती दिली त्यांचे रक्त सांडून मिळवलेल्या स्वातंत्र्याचा इतिहास संपविण्याचे काम कंगना राणावत करीत असल्याचे काँग्रेसने आपल्या निवेदनात म्हटले आहे. तसेच कंगना राणावत नेहमीच बेताल वक्त्यव्य करून देशाच्या ऐकतेमध्ये फूट पाडण्याचे आणि कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचे काम करीत असून वेळीच तिला आवर घालणे आवश्यक आहे. त्यामुळे कंगना राणावतला दिलेला पद्मश्री पुरष्कार काढून घेऊन तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी कल्याण डोंबिवली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे करण्यात आली आहे.
यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संतोष केणे, कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, महिला अध्यक्ष कांचन कुलकर्णी यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×