प्रतिनिधी.
अकोला -कोरोनाचा फैलाव आता बाळापूर, अकोट या सारख्या शहरात वाढत आहे. या ठिकाणी संदिग्ध व जोखमीच्या व्यक्तिंचे सर्वेक्षण करण्यात आले असून या सर्व लोकांनी कोरोना चाचणीसाठी स्वॅब देणे आवश्यक आहे. मात्र त्यासाठी लोक सहकार्य करत नाही असे निदर्शनास आले आहे. तेव्हा, तपासणीसाठी जे लोक सहकार्य करणार नाहीत अशा लोकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करा मात्र सगळ्यांच्या चाचण्या पूर्ण करा, असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिले.पालकमंत्री ना. बच्चू कडू यांनी आज कोरोना संसर्गाच्या सद्यस्थितीबाबत आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, मनपा आयुक्त संजय कापडणीस, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार आदी उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील कोरोनाच्या सद्यस्थितीबाबत माहिती सादर करण्यात आली. त्यानुसार येत्या काळात जिल्ह्यात दाखल होणाऱ्या रॅपिड टेस्ट किटच्या सहाय्याने करावयाच्या चाचण्यांचे नियोजन करा, असे निर्देश ना. कडू यांनी दिले. प्रतिबंधित क्षेत्राचा बंदोबस्त हा अधिक कडक असला पाहिजे. या क्षेत्राच्या बाहेरुन आत व आतून बाहेर ये जा करता कामा नये. जोखमीचे व अन्य व्याधींनीग्रस्त लोकांच्या चाचण्या पूर्ण करा. सर्वेक्षणाअंती ज्या ज्या लोकांच्या चाचण्या करणे आवश्यक आहे असे वाटते त्यांच्या चाचण्या करा. अकोट, बाळापूर येथे संदिग्ध व्यक्तींच्या तपासण्या पूर्ण करा. अशा ठिकाणी लोकांच्यामनात असलेली भिती दूर करण्याचा प्रयत्न करा. मात्र तरीही तपासणीसाठी सहकार्य न केल्यास त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करा, असे निर्देश ना. कडू यांनी यावेळी दिले. अकोट येथे ही आढावादरम्यान पालकमंत्री ना. कडू यांनी अकोट येथेही आढावा बैठक घेतली. या बैठकीस उपविभागीय अधिकारी गजानन सुरंजे, उपविभागीय पोलीस अधिकारी सोनवणे, तहसिलदार राजेश गुरव, मुख्याधिकारी दादाराव डोलारकर, तसेच स्थानिक अधिकारी व सर्व पक्षीय पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सर्व पक्षीय नेत्यांनी जनता कर्फ्यु पालन करुन कोरोना संसर्ग रोखण्याबाबत आवाहन केले. त्यानुसार पालकमंत्री यांनी सर्वांना सांगितले की, सर्वांनी एकमताने हा निर्णय घेऊन अंमलबजावणी करा. त्यानुसार दि.३ ते ९ जुलै या कालावधीत अकोट शहरात जनता कर्फ्यू पालन करण्यात येणार असून त्यास नागरिकांनी प्रतिसाद द्यावा,असे आवाहन ना. कडू यांनी केले. तसेच त्यांनी अधिकाऱ्यांचीही आढावा बैठक घेतली. ग्रामिण रुग्णालयास भेट देऊन तेथे वृक्षारोपण केले. प्रस्तावित कोविड केअर सेंटर इमारतीचीही पाहणी केली.
Related Posts
-
इस्रायल मराठवाड्यासाठी जल व्यवस्थापन क्षेत्रात सहकार्य करणार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- मराठवाड्यातील पाण्याच्या दुर्भिक्षावर मात करण्याच्या…
-
जालना जिल्हात झळकले कृषी मंत्री व पालकमंत्री हरवल्याचे बॅनर
नेशन न्यूज मराठी टीम. जालना/प्रतिनिधी - जालना जिल्ह्यासह मराठवाड्यात मागील…
-
खरीप हंगामाचे काटेकोर नियोजन करा-पालकमंत्री एकनाथ शिंदे
प्रतिनिधी . ठाणे - खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे खते, बियाणे,…
-
दूध भेसळ प्रकरणी, भेसळ नियंत्रण समितीची धडक कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. नंदुरबार / प्रतिनिधी - नंदुरबार जिल्ह्यात…
-
पालकमंत्र्यांची यादी जाहीर,पहा आपल्या जिल्हाच पालकमंत्री कोण?
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…
-
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कोविड केअर सेंटरची पालकमंत्री ना. बच्चू कडू यांच्या कडून पाहणी
प्रतिनिधी. अकोला - राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण,…
-
मुंब्रा खाडीत वाळू उपसा करणाऱ्या अवैध बोटीवर कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - वाळू माफिया…
-
पीकविम्याची प्रलंबित प्रकरणे निकाली काढा - पालकमंत्री धनंजय मुंडे
नेशन न्यूज मराठी टीम. बीड- बीड जिल्ह्यात नैसर्गिक संकटामुळे, अतिवृष्टीमुळे गेल्या…
-
डोंबिवलीत धोकादायक मांजावर कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली- मकर संक्रांतीच्या काळात खेळल्या जाणाऱ्या…
-
अग्निशमन वाहनांचे पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते लोकार्पण
गोंदिया/प्रतिनिधी - जिल्हा नियोजन समितीच्या अग्निशमन सेवा व बळकटीकरण या…
-
कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी
नेशन न्यूज मराठी टीम. बीड/प्रतिनिधी - वंचित बहुजन आघाडी, सम्यक…
-
नाशिक पोलिसांकडून प्रथमच महिलेवर तडीपारीची कारवाई
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. नाशिक/प्रतिनिधी- नाशिक पोलिसांच्या वतीने प्रथमच…
-
नवी मुंबईतील अनधिकृत होर्डिंग्सवर पालिकेची तडफदार कारवाई
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - मुंबईत काही…
-
शासनाच्या निर्णयास भाविकांनी सहकार्य करावे- गृहमंत्री देशमुख
प्रतिनिधी. पंढरपूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने वारकरी साप्रंदायाची परंपरा अखंडीत…
-
विनापरवाना डीजे लावणाऱ्या २२ जणांवर कारवाई
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. बुलढाणा/प्रतिनिधी - सध्या सगळीकडे लगीनसराई…
-
गुटखा विरोधी पोलिसांची मोठी कारवाई,१९ लाखाचा मुद्देमाल जप्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. धुळे/प्रतिनिधी - शिरपूर तालुका पोलिसांनी…
-
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महापालिकेची धडक कारवाई
प्रतिनिधी. कल्याण - महापलिका आयुक्त डॉ.विजय सूर्यंवशी यांचे मागदर्शनाखालील क…
-
कल्याणात महावितरणची वीज चोरी विरुद्ध धडक कारवाई
प्रतिनिधी. कल्याण - महावितरणच्या कल्याण पूर्व उपविभाग- एक अंतर्गत वीज…
-
मंदिरावर कारवाई करणाऱ्या पालिकेच्या अधिकाऱ्याचे निलंबन करण्याची ग्रामस्थाची मागणी
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - मोहने गाव परिसरातील जीर्णोद्धार सुरु असलेल्या गावदेवी…
-
मुंब्रा खाडीत अनधिकृत रेती उपसा करणाऱ्यांवर धडक कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - ठाणे जिल्हाधिकारी…
-
पालकमंत्री जयंत पाटील यांची मणदुरला भेट
प्रतिनिधी . सांगली - कोरोणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई व अन्यत्र नोकरीनिमित्त…
-
कल्याणातील विजय तरुण मंडळाच्या देखाव्यावर पोलिसांची कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/YawPqga_yEY कल्याण/प्रतिनिधी - कल्याण मधील विजय…
-
भिवंडीत महसूल विभागाची १९५ गोदामांवर जप्तीची कारवाई
भिवंडी प्रतिनिधी-महसूल विभाग कडून प्रत्येक वर्षी आर्थिक वर्ष समाप्तीच्या सुमारास…
-
करचुकवेगिरी प्रकरणी मुंबईत जीएसटी विभागाची कारवाई,एकाला अटक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - 40.95 कोटी रुपयांच्या बनावट…
-
पदपथांवरील अतिक्रमणांविरुध्द आता कडक कारवाई
प्रतिनिधी. कल्याण - महापालिकेच्या नागरिकांना रस्त्यांवरुन व पदपथांवरुन कुठल्याही खोळंब्याशिवाय…
-
तृतीयपंथीयांना पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते ओळखपत्राचे वितरण
नेशन न्युज मराठी टीम. नांदेड- जिल्ह्यातील तृतीयपंथीयांना सन्मानाने जगता यावे व…
-
कल्याण आरटीओ परिसरातील अनधिकृत टपर्यांवर पालिकेची धडक कारवाई
नेशन न्युज मराठी टीम.कल्याण - कल्याणच्या आरटीओ कार्यालयाला अनधिकृत टपऱ्यानी…
-
केडीएमसी क्षेत्रातील अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई सुरूच
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी…
-
सभेच्या मैदानावरून राणा दाम्पत्य व बच्चू कडू आमने-सामने
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. अमरावती/प्रतिनिधी - अमरावतीत प्रहार जनशक्ती…
-
सिंचन वाढविण्यासाठी जिल्ह्यातील नद्यांचे खोलीकरण व्हावे - जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू
अमरावती -जिल्ह्यातील चंद्रभागा, सापन, चारघड, पूर्णा, बिच्छन अशा विविध नद्यांच्या…
-
पंढरपुरात आंदोलनाची तयारी करा, बाळासाहेबांनी शासनाला दिला अखेरचा इशारा
मुंबई - राज्य सरकारने ३१ ऑगस्ट पूर्वी पंढरपूरचे मंदिर खुले…
-
कल्याण मध्ये महावितरणची ३९ वीज चोरी करणाऱ्यांवर कारवाई
नेशन न्युज मराठी टिम. कल्याण - महावितरणच्या कल्याण पश्चिम विभागात…
-
तलाठी परीक्षा सर्व्हर डाऊन, टिसीएसवर कारवाई करण्याची युवासेनेची मागणी
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे / प्रतिनिधी - तलाठी परिक्षा…
-
महावितरणच्या वसई विभागात वीज चोरांविरुद्ध धडक कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. वसई / प्रतिनिधी - महावितरणच्या वसई…
-
डोंबिवलीत ६ लाखांची वीजचोरी उघड,२० जणांविरुद्ध कारवाई
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - डोंबिवलीत वीजचोरी होत असल्याचे महावितरणच्या शोध मोहिमेत…
-
यंत्रमाग,गारमेंट उद्योग सुरू करण्यासंदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय -पालकमंत्री सोलापूर
प्रतिनिधी. सोलापूर - सोलापूर शहरातील यंत्रमाग व गारमेंट उद्योग सुरू…
-
संकटाच्या काळात एकत्र येऊन काम करण्याची गरज- पालकमंत्री ना. बच्चू कडू
प्रतिनिधी. अकोला - कोरोना चे संक्रमण हा अभूतपुर्ण अशा संकटाचा…
-
केडीएमसीची अनधिकृत इमारतीच्या बांधकामावर निष्कासनाची कारवाई
नेशन न्युज मराठी टीम. कल्याण - कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉ.…
-
गोंडपिपरी तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या विषबाधा प्रकरणी पालकमंत्री यांचे चौकशीचे आदेश
नेशन न्यूज मराठी टीम. चंद्रपूर/प्रतिनिधी - गोंडपिपरी तालुक्यातील चेक बोरगांव…
-
कल्याण ग्रामीण खोणी गावातील ५५ वीजचोरांवर कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - वीजचोरी शोध मोहिमेवरील…
-
संपर्क शोधाचा कालावधी कमीत कमी करा- पालकमंत्री बच्चू कडू यांचे निर्देश
प्रतिनिधी . अकोला - अकोला जिल्ह्यात वाढत असलेला कोरोना प्रादुर्भावाला…
-
धुळे तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा मागणीसाठी चक्काजाम
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे / प्रतिनिधी - धुळे तालुक्यात…
-
कोकण हापूस आंब्याच्या नावाने फसवणूक करणाऱ्यावर कारवाई होणार
मुंबई प्रतिनिधी- आंबा हा शेतमाल ज्या राज्यातून व ज्या नावाने त्याची…
-
चिखली पोलिसांची धडाकेबाज कारवाई, ३१ लाखाचा गांजा केला जप्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. बुलढाणा/प्रतिनिधी - लोकशाहीच्या सर्वात मोठ्या…
-
सोयाबीन फसवणूक प्रकरणी कठोर कारवाई-पालकमंत्री अशोक चव्हाण
प्रतिनिधी. नांदेड - पेरणी केलेल्या सोयाबीनच्या बियाण्यांची उगवणच न झाल्याच्या…
-
पोलीस स्मृती दिनानिमित्त पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिवादन
ठाणे/प्रतिनिधी - पोलीस स्मृती दिनानिमित्त ठाणे पोलीस आयुक्तालयातर्फे आयोजित अभिवादन कार्यक्रमात…