नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/संघर्ष गांगुर्डे – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमीत्त कल्याण चे 15 जलतरण खेळाडू मुरुड बीच पासून पद्मदुर्ग किल्ले आणि पुन्हा पद्मदुर्ग किल्ले से मुरुड जंजिरा किल्ला हे एकुण 9 किलो मिटर अंतर पोहून पार करणार आहेत.
हे सर्व विद्यार्थी सॅक्रेड हार्ट स्कूलचे असून विद्यार्थ्यांबरोबर शिक्षक आणि पालक ही या मोहिमेत सहभागी होणार आहेत.या सर्व विद्यार्थ्यांचे प्रशिक्षक राम म्हात्रे यांनी या मोहिमेबद्दल बोलताना सांगितले की, महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांचे जतन आणि संर्वधन झाले पाहिजे व पुढच्या पीढीला महाराजाचा इतिहास पाहता आला पाहीजे आणि गड-किल्ले यांची माहीती झाली पाहीजे हा प्रमुख उद्देश या मोहिमेमागे आहे.
या या धाडसी मोहिमेमध्ये आमच्याबरोबर सहभागी झालेले विद्यार्थी व शिक्षक आणि पालकांमध्ये सक्षम म्हात्रे, अधिराज म्हात्रे, रोनित म्हात्रे, अनवित तोडकर, समरुधी शेट्टी, तृष्या शेट्टी, अभिप्रत विचारे, ऋतुराज विचारे, श्रीरंग सालुखे, सिध्यश पात्रा, मयाक पात्रा, समर मोहपे, निनाद पाटील तसेच शिक्षक रामचंद्र म्हात्रे काशिनाथ मोहपे, संदिप तोडकर, निलेश पाटील, द्रेवेद् सालूके हे उपक्रम पोहुन शिव जयंती साजरी करणार आहेत.