नेशन न्यूज मराठी टीम.
डोंबिवली/प्रतिनिधी – साईश मालवणकर याने रात्री २ वाजता कारंजा जेटी येथून अंगाला ग्रीस लावून समुद्राची पूजा करून अथांग पसरलेल्या अरबी समुद्रात महाराष्ट्र राज्य हौसी जलतरण संघटनेचे निरीक्षक नील लबदे यांच्या मार्गदर्शनाखाली पाण्यात पोहण्यास सुरुवात केली.कशाची ही पर्वा न करता साईश पोहत राहिला.साईशला सगळीकडे अंधार असल्यामुळे समुद्रात थोडी भिती तर वाटत होती. समुद्रात भरती ओहोटी येते.त्यात पाण्याचा सामना करावा लागत असे. समुद्रातील वाढते प्रदूषण , गेटवे जवळ पाण्यावर तेलाचा तवंग होता.त्यामुळे थोडा त्रास व्हायचा.समुद्रात जहाजे मोठी मोठी येत जात होती.त्यांच्या लाटा उसळत होत्या.सर्वांचा मुकाबला करून साईश सकाळी गेटवे ऑफ इंडिया ला पोहचला.
उपस्थितांनी व प्रशिक्षक यांनी साईश चे जोरदार स्वागत केले.6 तास 16 मिनिटात साईश ने एक विक्रम केला.याआधी हे कारंजा पोर्ट ते गेटवे ऑफ इंडिया हे सागरी जलतरण अंतर कोणीच पोहले नसून ते आता साईश च्यां नावावर हा रेकॉर्ड असेल. साईश ला पाण्यात सपोट करणारे अलपा जगताप,देलिना, आनंका, गितिषा, अहांन,राज,दृही पाटील होते. साईश यश जिमखाना येथे स्विमिंग शिकण्यासाठी आला होता. स्विमिंग शिकून झाल्यानंतर प्रशिक्षक विलास माने यांच्याकडे advance coaching चालू केले.2 महिन्यानंतर मुंबई येथे झालेल्या राज्यस्तरीय सागरी (संक रॉक ते गेटवे ऑफ इंडिया ) जलतरण स्पर्धेत प्रथमच 5 किलोमिटर मध्ये काहीही अनुभव नसताना उत्तम कामगिरी केली. 1 तासाच्या आत पोहून पूर्ण केले.
नंतर त्याला समुद्रची आवड निर्माण झाली.आणि स्वतः सागरी इव्हेंट करायची निर्णय घेतला.यासाठी साईश एक महिना दररोज यश जिमखाना मध्ये 5 ते 6 तास प्रॅक्टीस प्रशिक्षक विलास माने व रवी सर यांच्या मार्गदर्शनाखाली केली.यश जिमखाना मालक राजू वडनेरकर यांनी सरावा साठी रात्रीचा पूल उपलब्ध करून दिला. इव्हेंटसाठी शुभेच्या दिल्या.महिन्यातून 2 वेळेस उरण येथे संतोष पाटील सर यांच्याकडे समुद्रात प्रॅक्टीस साठी घेऊन जात होतो.जिमखाना मॅनेजर मनोज सप्रा, पतंगे मॅडम,आणि कर्मचारी स्टाफ यांच्याकडून मोलाचं मार्गदर्शन मिळाले.प्रशिक्षक विलास माने आणि रवि नवले,अरुण धाबले यांनी साईश चे स्वागत करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.