Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
Default Image ठाणे लोकप्रिय बातम्या

स्मशानभूमीत काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना जीव मुठ्ठीत घेऊन करावे लागते काम

कल्याण/प्रतिनिधी – कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात वाढत्या कोरोना रूग्णांसह मृतांचा आकडा देखील वाढत असून या मृतांवर विविध स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. हे करतांना मृतदेह हाताळणारयांकडून वापरण्यात आलेले पिपिई कीट कोणतीही विल्हेवाट न लावता त्याठिकाणी उघड्यावर टाकण्यात येत असल्याने हे पिपिई कीट सफाई कामगारांना उचलावे लागत असून यामुळे या सफाई कर्मचाऱ्यांचा जीवाला धोका निर्माण झाला आहे.

      कोरोनाच्या सुरवातीच्या काळापासून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सफाई कर्मचारी महत्त्वाची भूमिका निभावत आहेत. शहरातील रस्त्यांची नियमित साफसफाई करणे, कचरा कुंड्यांमधील कचरा उचलणे, इतरत्र असलेला कचरा गोळा करणे आदी महत्त्वाची कामे करून शहर स्वच्छतेकडे भर देत आहेत. हे करत असतांना स्मशानभूमीतील कचरा गोळा करतांना त्यांना त्याठिकाणी टाकलेले पिपिई कीट देखील कोणत्याही सुरक्षाविषयक साधनांशिवाय उचलावे लागत आहेत.

पिपिई कीट हे बायोमेडिकल वेस्ट प्रकारात येत असल्याने त्यांची विल्हेवाट हि विशेष खबरदारी घेऊन विशिष्ट पद्धतीने हाताळणे आवश्यक आहे. शिवाय हे बायोमेडिकल वेस्ट प्रक्रिया केंद्रात जमा करणे आवश्यक आहे. हे काम मेडिकल डिपार्टमेंटच आहे. असे असतांना हे पिपिई कीट इतर कचऱ्या सोबत डम्पिंग ग्राउंडला टाकण्यात येत आहे.  याबाबतचे कोणतेही प्रशिक्षण या सफाई कर्मचाऱ्यांना दिले जात नाही. यामुळे सफाई कामगार आजारी पडण्याचे प्रमाण देखील वाढले आहे.

सफाई कर्मचारी जीवाची पर्वा, कुटूंबाची पर्वा नकरता आपले कर्तव्य पार पाडतात. परंतु प्रशासन त्याच्या जीवाशी खेळत असून  त्यांना  कोणत्याही प्रकारचे सुरक्षा विषयक साधने पुरवली जात नाहीत. सॅनिटायझर दिले जात नाहीत, मास्क पुरवले जात नसल्याचा आरोप या सफाई कर्मचाऱ्यांनी केला आहे.

आम्हाला सुद्धा परिवार आहे, आमची सुद्धा लहान मुलं आहेत. सफाईचे महत्त्वपूर्ण काम करत असतांना देखील अद्याप सफाई कामगार लसीकरणापासून वंचित आहेत. लसीकरण कुठे करायचं हे बऱ्याचशा सफाई कामगारांना माहिती नाही. रुक्मिणीबाई हॉस्पिटल मध्ये गेलो तर तेथे वरिष्ठ नागरिकांना लसीकरण आहे असं सांगितलं जातं. आमचे आरोग्य निरीक्षक तर कोणतीच माहिती आम्हाला देत नाहीत फक्त्त कामच सांगत आहेत. तुमचं नाव आल्यानंतर तुम्हाला कळवलं जाईल अस सांगितलं जातं असल्याचे या सफाई कामगारांनी सांगितले.

 दरम्यान याबाबत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्याशी संपर्क साधला असता याप्रकरणात योग्य त्या सुरक्षा उपाययोजना करण्याच्या सूचना आरोग्य निरीक्षांकाना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X