नेशन न्यूज मराठी टीम.
https://youtu.be/hoYmAQItCU4
इचलकरंजी – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात दिवसा वीज मिळावी या मागणीसाठी कोल्हापूरमध्ये आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन तीव्र होत चालले आहे. दरम्यान आज काही आंदोलकांनी इचलकरंजी येथील महावितरण अधिकाऱ्यांचे टेबलावर जिवंत साप सोडले.
इचलकरंजी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महावितरण अधिकाऱ्यांच्या टेबलावर जिवंत साप सोडले. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तर काल रात्री शिरोळ तहसील कार्यालयात काही अज्ञात शेतकऱ्यांनी साप सोडल्याचा प्रकार उघडकीस आला होता. दरम्यान शेतकरी संघटनेने आपल्या मागण्या जोपर्यंत मान्य होणार नाहीत तोपर्यंत माघार घेणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे.
Related Posts