नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम.
सांगली/प्रतिनिधी – सांगली मध्ये ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.आणि दत्त इंडिया संचलित वसंतदादा कारखान्यासमोर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आला आहे. कारखान्यांमध्ये घुसण्याचा देखील स्वामिनीच्या कार्यकर्त्यांकडून प्रयत्न करण्यात आला होता. मात्र पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले. त्यामुळे आता कारखान्याच्या गेट समोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
स्वतः राजू शेट्टी या ठिकाणी कारखान्याच्या गेट समोर ठाण मांडून बसले आहेत. जोपर्यंत उस दराचा निर्णय जाहीर होत नाही,तोपर्यंत कारखान्यासमोरून उठणार नाही,अशी भूमिका राजू शेट्टींनी घेतलेली आहे. तसेच जयंत पाटील व विश्वजित कदम यांच्यामुळे शेतकऱ्यांना दर मिळत नाही,असा आरोप शेट्टींनी केला आहे. त्यामुळे आंदोलन आणखी चिखळणार,अशी स्थिती निर्माण झाली असून पोलिसांचा तगडा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे.