नेशन न्यूज मराठी टीम.
संभाजीनगर/प्रतिनिधी – महाराष्ट्रातील प्रकल्पाबाबत खुलासा करताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महाविकास आघाडीची परखड पाने बाजू मांडली ते म्हणाले मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केलेले आहे ते चुकीच आहे. मी एकच उदाहरण देतो मुख्यमंत्री ज्या खात्याचे मंत्री होते महाविकास आघाडीच्या मंत्रीमंडळात मुख्यमंत्री महत्त्वाचे मंत्री होते. समृद्धी महामार्ग हा देवेंद्र फडणवीस यांच्या काळात सुरू झालेला महामार्ग महाविकास आघाडीच्या काळात कुठे थांबला, स्वतः उद्धव ठाकरे आताचे मुख्यमंत्री जे आहेत त्यांना सोबत घेऊन दौरा केला पाहणी केली कोणताही निधी कमी पडणार नाही याची खबरदारी घेतली. अनेक गोष्टी अशा आहे की महाविकास आघाडीने ज्या पद्धतीने काम केले या महाराष्ट्रातील सर्व प्रकल्प गतीने मार्गी लावलेले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील जे सरकार होते त्या काळातील अनेक प्रकल्प उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात पुढे नेण्याचा प्रयत्न केला. उलट आता जे सरकार आलेले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,देवेंद्र फडणवीस यांच्या काळात गाव पातळीवरील कामांची स्थगिती दिसत आहे.अशी टीका या वेळी दानवे यांनी शिडे फडणवीस सरकारवर केली आहे. त्याच प्रमाणे ते हेही म्हणाले अजून सुद्धा स्थगिती उठवण्याच्या शेकडो फाईल पडलेल्या आहेत . विरोधी पक्षातील एखाद्या आमदाराला तो व्यक्ती भेटला तर त्याच्या फाईलवर अर्जावर सही होत नाही पत्रावर सही होत नाही. राजकीय विरोधक असलेल्या माणसाच्या पत्रावर सही होत नाही आमदारांचा राग लोकांवर का काढता आणि सर्वात मोठी जी स्थगिती दिली आहे. म्हणजे या आताच्या सरकारने दिलेली आहे आणि ती उठण्याची आवश्यकता आहे.
मला असं वाटतं मुख्यमंत्री केंद्र सरकारची भाजपची तळी का उचलतात. आम्हाला पिशाच्च झाले म्हणण्यापेक्षा तुम्हालाच बाहेर वाद झालेला आहे. खेड्यापाड्यामध्ये म्हणतात की याला बाहेर वाद झालेला आहे. की कोणाचं एवढं ऐकायचं एवढं ऐकायचं, की एखाद्याला काही सांगितले तरी ऐकायचं एखाद्याने सांगितले विहिरीत उडी मार तरी तुम्ही विहिरीत उडी मारून टाकणार अशा प्रकारे भारतीय जनता पार्टी मोदी सरकारचा बाहेर वाद झालेला आहे. राष्ट्रपतींना देशातील सर्व आमदारांनी खासदारांनी निवडून दिलेले आहे. त्यांच्या शुभहस्ते संसदेचे उद्घाटन करावे म्हणजे हे पिशाचं मनाने आहे का? लोकशाहीने राष्ट्रपतींना उद्घाटनाला आणा म्हणजे हे लोकशाहीच्या विरोधात आहे का त्यांच्याच भाषेत सांगायचे म्हटले तर खरे पिशाच आम्हाला नाही. तर त्यांनाच बाहेर वाद झालेला असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली.