नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/प्रतिनिधी – कल्याणच्या तिसगाव परिसरात बारा वर्षीय प्रणिती दास या अल्पवयीन मुलीची सोसायटीमध्ये घुसून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी आज शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी जॉईन सिपींची भेट घेत या प्रकरणाची माहिती घेतली. सत्ताधारी हे आपल्यातील संघर्ष सोडविण्यात मशागुल असून सर्वच पोलीस सुरक्षा त्याच्या संरक्षण साठी खर्च होत आहे त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांकडून गृहखात्याच्या वापर सत्ता होताना दिसत आहे आणि जनतेची सुरक्षा वाऱ्यावर आहे.
कल्याण शहरांमध्ये गुन्हेगारांचा मुक्त आणि मोकाट संचार आहे.१५ दिवसात तीन घटना घडल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहखात्याचा वापर फक्त सत्ता संघर्षासाठी करण्याचे ठरवले आहे. शिंदे गटांच्या लोकांना अतिरिक्त सुरक्षा दिली जात असताना अपुरे पोलीस बळ आहे असे सांगितले जाते. शिवाय कल्याणच्या प्रकरणांमध्ये हत्या करणारा आरोपी आदित्य कांबळे याचं वय वारंवार कमी केले जात असून त्याला अल्पवयीन ठरवण्याचा प्रयत्न केला जातोय असा देखील आरोप अंधार यांनी केला. डोंबिवलीत विनयभंगाची तक्रार दाखल करणाऱ्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी केली जाते ,याचा अर्थ पोलीस अधिकारी दबावाखाली काम करत आहेत असा आरोप अंधारे यांनी केलाय. अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय शिंदे शिवसेना पदाधिकारी सहभेट घेऊन आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.यावेळी हर्षवर्धन पालांडे सचिन बासरे , धनंजय बोराडे, विजया पोटे, दत्ता खंडागळे , राणी कपोते संदीप कपोते, आशा रसाळ , राधिका गुप्ते इत्यादी शेकडो ठाकरे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते.