नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/प्रतिनिधी -उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडला आहे कारण ते त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती केली म्हणून हिंदुत्व सोडलाय अशी जर देवेंद्र फडणवीस यांची धारणा असेल तर मग त्याच राष्ट्रवादीसोबत नागालँड मध्ये घरोबा करणारी भाजपा ही नकली हिंदुत्ववादी आहे असाच याचा अर्थ होतो. मग आता यांच काय करायचं म्हणजे देवेंद्र यांनी सुद्धा भाजपा सोडली पाहिजे आणि पूर्ण वेळ संघाचा कार्यकर्ता म्हणून फिरले पाहिजे कारण हिंदुत्व जास्त महत्त्वाचे आहे उपमुख्यमंत्र्यांच्या पदाच्या खुर्चीला त्यांनी एका क्षणात लाथ मारली पाहिजे आणि पूर्णपणे संघाचा कार्यकर्ता म्हणून जॉईन झाले पाहिजे ते जास्त महत्त्वाचे आहे.असे भाष्य करत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्यावर सुषमा आंद्रे यांनी टीकेची झोड उठवली
साई रिसॉर्ट प्रकरणां संदर्भात बोलतानासुषमा अंधारे म्हणाल्या की साई रिसॉर्ट प्रकरणांमध्ये जे काही घडलं त्यामध्ये एकाच दिवशी 34 लोकांना सीआरझेड चा परवाना मिळाला होत सीआरझेडच्या परवाण्या नंतर एन ए ची परमिशन मिळाली परमिशन मिळाल्यानंतर बांधकाम परवानगी मिळाली जर एन ए ची परमिशन नसती तर बांधकाम परवानगी मिळाली नसती सीआरझेड नसता तर एन ए चा परवाना देखील मिळाला नसता याचा अर्थ संबंधित जे बांधकाम अधिकारी आहेत त्यांची सुद्धा जाब जबाब झाला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे जर 34 लोकांना परवानग्या मिळाल्या होत्या तर 34 वे परब कसे काय दिसतात आधीचे 33 लोकांचे काय त्या 33 लोकांवर किरीट भाऊंनी बोललं पाहिजे अनधिकृत बांधकाम विषय असेल तर एकट्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 2060 अनधिकृत बांधकामे आहेत 2059 लोकांचे काय यावर पण किरीट यांनी बोलले पाहिजे आणि त्यातही चिवल्या बिच वरचा जो बंगला आहे जो नारायण राणे यांचा आहे ज्याला पाडण्याची कोर्टाने ऑर्डर दिली तरी ऐकली नाही यावर कोर्टाने आता एक स्मरण पत्र कलेक्टर यांच्या नावाने लिहिलेला आहे त्यावर काहीच कारवाई होत नाही अतिक्रमण विभाग जर कामात बिझी असेल तर किरीट भाऊंनी नेहमी प्रमाणे हातात हातोडा घेऊन जाण्यास काही हरकत नाही पार्ट टाइम पेमेंट त्यांना मिळेल त्यात काहीच हरकत नाही. असे बोलत किरीट सोमाय्यावर आपल्या नेहमीच्या शैलीत टीका केली.
यावेळी गौरी भिडे प्रकरणात संविधानिक न्यायव्यवस्थेवरचा विश्वास परिदृढ करणारा असा हा निकाल आहे पण या निमित्ताने गौरी भिडे हा फक्त एक चेहरा आहे त्याच्या पाठीमागे मास्टर माईंड कोण हे हे शोधले पाहिजे तर आम्हाला मिळालेला दिलासा पाहून जर ते अस्वस्थ झाले असतील आमच्या शिंदेंना देखील हेच मास्टर माईंड चालवतात असं मला वाटतं.आशी त्या म्हणाल्या.