डोंबिवली/प्रतिनिधी – जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात टेलगट ट्युमर नावाचा दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असते. असा गुंतागुंतीचा आजार झालेल्या रुग्णाची अवघड शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आल्याची माहिती बाज-आर आर रुग्णालयाचे डॉ. आमीर कुरेशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी रुग्णालयाचे डॉ. भरत तिवारी आणि जेकब थाँमस उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत माहिती देताना डॉ. कुरेशी म्हणाले, बाज-आरआर हॉस्पिटल येथे या रुग्णाची शस्त्रक्रिया करण्यात आली असून कोलोलॅक्टल सर्जन डॉ. चिंतामणी गोडबोले, जनरल सर्जन डॉ. ऑन धुरू आणि त्यांच्या चमूने हे ऑपरेशन यशस्वी केले. माकड हाड आणि गुदाशय या अवयवांच्या मधोमध असलेल्या आतडीला ही गाठ येते आणि हळू हळू ती वाढते. ही गाठ कर्करोगाची नसली तरी शौचप्रक्रियेला त्रासदायक ठरते. त्यामुळे ही गाठ काढण्यासाठी शस्त्रक्रिया करणे गरजेचे असते. आजपर्यंत संपूर्ण भारतात या रोगाचे केवळ ५३ रुग आढळले असल्याचे एक संशोधनाद्वारे सांगण्यात आले आहे. शौचाला जाण्याची क्रिया वारंवार होणे किंवा शौचाचा रंग बदलणे यासारख्या क्रिया सातत्याने घडणे ही या रोगाची लक्षणे असून शस्त्रक्रिया करताना अंत्यंत सावधपणे करावी लागते. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे माकड हाड आणि गुदाशय या भागात अनेक रक्तवाहिन्या आणि पायाला जोडणारे मज्जातंतू असतात. हे मज्जातंतू जर दुखावले गेले तर कंबरेपासून पायापर्यंत एखादा अवयव निकामी होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे ठराविक योजना आखून काळजीपूर्वक ही शस्त्रक्रिया करण्यात यश आले आहे. आता सदर रुग्णास कायमस्वरूपी मल विसर्जनासाठी कृत्रिम कोलो स्टोमी बॅग लावली असून रुग्णाला लवकरच घरी सोडण्यात येणार आहे.
डोंबिवली औद्योगिक विभागातील बाज-आरआर हॉस्पिटल कोरोना काळात कोवीडमुळे चर्चेत आले. चांगल्याप्रकारे कोरोना रुग्णांना उपचार मिळण्याची अनेकांना जीवदान मिळाल्याची माहिती खुद्द कोरोना रुग्णांनी दिली. रुग्णालय अद्ययावत तांत्रिकदृष्ट्या सक्षम असल्याने आणि खोल्यांची व्याप्ती मोठया प्रमाणात असल्याने अनेक कोरोना रुग्णांची भरती होत होती. वाहनतळ मोठे असल्याने या रुग्णालयात रुग्णवाहिका जा-ये करण्यात अडचण येत नव्हती. डॉ. कुरेशी यांचे हॉस्पिलिटी नियोजन निष्णात होते अशी रूग्णांना मिळालेल्या उपचार पध्दतीने स्पष्ट झाल्याची अनेक उदाहरणे डोंबिबलीकरांनी अनुभवली आहेत. आता बाज-आरआर. रुग्णालयात नॉन-कोविड रुग्ण दाखल होत असून रुग्णांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ मिळत आहे.