महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
ताज्या घडामोडी राजकीय

सुरेश नवले यांचा मविआ ला पाठिंबा,पंकजा मुंडेंची वाढली डोकेदुखी

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

बीड/प्रतिनिधी – बीड जिल्ह्यातील राजकारणाला नवीनच वळण लागले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे माजी मंत्री सुरेश नवले यांनी पक्षाला राजीनामा दिला आहे. बीड जिल्ह्यात पहिल्यांदाच पंकजा मुंडे लोकसभा निवडणूक लढवत आहेत. पंकजा मुंडे यांना विजयी करण्यासाठी महायुतीकडून जोरदार प्रचार सुरू आहेत. पण पक्षाच्या अंतर्गत अनेक मतभेद सुद्धा आहे.

महायुतीला बीडमधून लागलेला झटका हा पचवण्यासारखा नाही आहे. शिवसेनेचे माजी मंत्री सुरेश नवले यांनी कार्यकर्ता संवाद मेळावा घेऊन आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली. नवले यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांना हा धक्का मानला जातोय. माजी मंत्री सुरेश नवले यांचा जिल्ह्यात मोठा संपर्क आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटातून महत्त्वाच्या पदाचा राजीनामा देऊन त्यांनी हा पाठिंबा आणि आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दौरा होता. त्याच दिवशी सुरेश नवले यांनी आपली नाराजी जाहिरपणे व्यक्त केली होती. पण सुरेश नवले एवढी कठोर भूमिका घेतील असे कुणाला स्वप्नात देखील वाटले नव्हते. लोकसभेची निवडणूक अंतिम टप्प्यात आली असून या माध्यमातून महत्त्वाचे नेते आपली भूमिका स्पष्ट करत आहेत.

Translate »
×