नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
कल्याण/प्रतिनिधी – भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे(शरद पवार गट) प्रभारी म्हणून सुरेश म्हात्रे यांची नियुक्ती झाली आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने धावा केला आहे. ही जागा राष्ट्रवादीला गेली तर सुरेश म्हात्रे हे राष्ट्रवादीचे उमेदवार असणार आहेत.
या पार्श्वभूमीवर कल्याणमध्ये कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून सुरेश म्हात्रे यांच्या सत्कार कार्यक्रमाच्या आयोजन करण्यात आला होते. या कार्यक्रमात सुरेश मात्रे यांच्यासह कल्याण पश्चिम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी संदीप देसाई उमेश बोरगावकर, दिनेश परदेशी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.