Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
ताज्या घडामोडी राजकीय

केंद्र व राज्य सरकारवर सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

नेशन न्यूज मराठी टीम.

बीड / प्रतिनिधी – बीडच्या अंबाजोगाईत खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना नारायण दादा काळदाते स्मृती सन्मती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी झालेल्या भाषणादरम्यान सुळे यांनी शासन आपल्या दारी कार्यक्रमावरून राज्य सरकार तर भारत आणि इंडिया च्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला लक्ष केले आहे.

शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी टाकल्या जाणाऱ्या पेंडोलला एक कोटी रुपयांचा खर्च होतो. शासन आपल्या दारी म्हणजे दारात येऊन योजना दिल्या पाहिजेत. कार्यक्रम घेऊन कोटी रुपये खर्च कशासाठी? त्यामुळे या कार्यक्रमाला विरोध असल्याचं सुळे यांनी म्हटले आहे. तर इंडिया आणि भारतच्या नावावरून जनतेवर 14 हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. या नावामुळे आमचे विरोधक घाबरले असून ते इंडियाचे नाव भारत करू पाहत आहेत.

पण आमची भाजपला विनंती असून आम्ही आमचे नाव भारत करतो तुम्ही इंडियाच ठेवा अशी विनंती सुळे यांनी केली. या चौदा हजार कोटीतून सरसकट महाराष्ट्राची कर्जमाफी होईल तर याच पैशातून शाळा हॉस्पिटल होतील. शिवाय महाराष्ट्रात पुरुषांना देखील एसटी मोफत होईल. असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X