नेशन न्यूज मराठी टिम.
सातारा/प्रतिनिधी – स्वराज्याची राजधानी असलेल्या सातारा जिल्ह्यातील अदिती स्वामी हिने जागतिक तिरंदाजी स्पर्धेमध्ये सुवर्णपदाची कामगिरी करून एक इतिहास रचला आहे. तिच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे सातारच्या शिरपेचमध्ये आणखी एक मनाचा सुवर्ण तुरा रोवला गेला आहे. अदिती ही गेली अनेक वर्षे तिरंदाजीचे प्रशिक्षण प्रवीण सावंत यांच्याकडून घेत अली आहे तिच्या आत्मविश्वासावर आणि अथक परिश्रमामुळेच अदितीने मेक्सिकोच्या अँड्रिया बेसेरा हिला 149-147 अशा फरकाने पराभूत करून विश्वविजेते पदावर आपले नाव कोरले आहे.
अदिती स्वामी हिने तिरंदाजी स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवून सातारचे नाव देशपातळीवर झळकवले आहे. अदितीने केलेल्या विश्वविक्रमामुळे तिच्या शेरेवाडी गावात एकच जल्लोष करण्यात आला. आगामी काळात होणाऱ्या आशियाई स्पर्धेमध्ये देशाला सुवर्ण पदक मिळवून देण्याचा तिचा मानस असून तिरंदाजीचे गुरू प्रवीण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली मी हे स्वप्न देखील देशाला पूर्ण करून दाखवणार असल्याची भावना तिने यावेळी बोलून दाखवली आहे.