Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
Default Image महाराष्ट्र लोकप्रिय बातम्या

सुजात आंबेडकर यांचा युवा आदिवासी संवाद दौरा संपन्न

नेशन न्यूज मराठी टिम.

अकोला/प्रतिनिधी – वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर ह्यांनी तेल्हारा तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात आदिवासी पाड्यावर आणि वस्ती वस्ती मध्ये महिला- पुरुष, युवक जावून एका दिवसात बारा गावात जावून संवाद साधून आदिवासी भागातील समस्या समजून घेतल्या. यावेळी युवा आघाडी जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, महासचिव राजकुमार दामोदर, संघटक समीर पठाण, सोशल मिडीया प्रमुख प्रशिक मोरे, जिल्हा उपाध्यक्ष सुबोध डोंगरे, निलेश इंगळे, जिल्हा सचिव आनंद डोंगरे, श्रीकृष्ण देवकुणबी, तालुका अध्यक्ष जिया शाह, महासचिव प्रा. संदीप गवई, संघटक अनंता इंगळे व युवा आघाडी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

28/08/2023 सकाळी अकोल्यातून प्रस्थान करून छोटा आडगाव येथील कार्यकर्त्यांच्या सोबत भेट घेतली.तर सकाळी स. 10 वा. – पिंपळखेड, आदिवासी चावडी येथे समुह प्रमुख (पटेल) आणि समूह सदस्य व आदिवासी ग्रामस्थ ह्यांचेशी संवाद साधला.त्यानंतर अतिशय दुर्गम असलेल्या आणि रस्तेच नसलेल्या मोह्पानी येथे बाईकवर जावून स. 11वा. – मोहपानी आदिवासी समूहाच्या समस्या बाबत चर्चा केली.त्यानंतर बाईकवरून दुपारी 12 वा.- अंबाबरवा येथे जावून रस्ते, जातीचा दाखला,समाज मंदिर घरकुल विषयावर समस्या बाबत चर्चा केली.त्यानंतर दुपारी 1 वा. – जुनी तलई शाळा, वीज जातीचा दाखला आरोग्य ह्या बाबतीत चर्चा केली.त्यानंतर दुपारी 2 वा. – उमरशेवडी आदिवासी ग्रामस्थांशी चर्चा. दुपारी 3 वा. – चंदनपुर आदिवासी भागात विकास व समस्या बाबत संवाद साधला.दुपारी 4 वा. – नई तलई पूर्णवसीत गाव येथे आणि संध्या. 5 वा. – बोरवा, संध्या. 6 वा. – भिली येथे संवाद साधला गावातील स्त्रीयांना पिण्याचे पाणी आणायला ज्या खोऱ्यात जावे लागते त्या खो-यात उतरून प्रत्यक्ष उगमा पर्यत नदीत जावून पाहणी केली.त्यानंतर संध्या. 7 वा. – गायरान येथे पाच गावच्या बैठकी आधी ग्रामपंचायत चे वतीने चौकात सुजात आंबेडकर ह्यांचा सत्कार पारंपारिक आदिवासी पद्धतीने करण्यात आला.त्यानंतर आदीवासी समूह नृत्य मध्ये सहभागी होवून फेर धरला.त्यानंतर गायरान येथे चीपी, करी, रुपागड आणि धोंडाआखर ह्या पाच गावातील आदिवासी ग्रामस्थां संवाद साधून आदिवासी समूह नृत्य पाहिले.त्यानंतर युवा आघाडी पदाधिकारी सोबत आदिवासी समुहाचे घरी उडीद डाळ, मक्का रोटी आणि भाकरी खाल्ली.त्यानंतर एदलाबाद येथे भेट देवून स्थानिक कार्यकर्ते ह्यांचे सोबत संवाद साधला.

ह्या समस्या सोडविण्यासाठी लवकरच अधिकारी थेट ह्या आदिवासी गावात घेवून जात त्या ठिकाणी जनता दरबार लावून समस्या सोडविण्यासाठी रूपरेखा तयार करण्याचा संकल्प युवा आघाडीने केला आहे.ह्यावेळी युवा आघाडीचे पदाधिकारी आशिष रयबोले, पुरुषोत्तम अहिर, तेल्हारा युवा आघाडीचे संघटक खंडूजी घाटोळ उपाध्यक्ष संतोष हागे उपाध्यक्ष सदानंद खंडेराव प्रसिद्धी प्रमुख राहुल घंगाळ, दिनेश इंगळे, कपिल तायडे, मनोज हिरोळे पवन भुडके,अब्दुल आरिफ, विशाल घ्यारे, विजय अढाउ,राजू जहागीरदार,नागेश तायडे,कमरोद्दिन, उमेश सरदार,अजिमोद्दीन,अमर मावसे,शेख अथहर,अविनाश सिरसाट,शुभम वाघोळे,बाबल्या जांभळे प्रामुख्याने सहभागी होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X