मुंबई प्रतिनिधी- ‘‘आपण स्वत:ला वास्तविक मनुष्य म्हणवून घेत असू तर आपल्यामध्ये मानवी गुण असण्याची नितांत गरज आहे. या विपरीत कोणतीही भावना मनामध्ये येत असेल तर स्वतःचे मूल्यांकन करावे लागेल, सूक्ष्म नजरेने मनाच्या तराजूत तोलून पहावे लागेल. असे केले तर आपण कुठे चुकत आहोत हे आपल्याला उमगू शकेल.’’ असे प्रेरणादायी विचार निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी महाराष्ट्राच्या तीन-दिवसीय 54व्या वार्षिक संत समागमाच्या समारोप प्रसंगी काढले. 28 फेब्रुवारी रोजी या संत समागमाची यशस्वीपणे सांगता झाली. व्हर्च्युअल रूपात आयोजित करण्यात आलेला हा तीन-दिवसीय संत समागम जीवनाला एक नवी दिशा, ऊर्जा आणि सकारात्मकता देऊन गेला. समागमाचे थेट प्रसारण निरंकारी मिशनची वेबसाईट तसेच संस्कार टी.व्ही. चॅनलच्या माध्यमातून करण्यात आले. संपूर्ण भारतासह विदेशातील लाखो निरंकारी भक्तांनी तसेच अन्य भाविक सज्जनांनी घरबसल्या या संत समागमाचा भरपूर आनंद प्राप्त केला.
सद्गुरु माता सुदीक्षाजी म्हणाल्या, की वास्तविक मनुष्य होण्यासाठी सकळजनांवर प्रेम करणे, सर्वांच्या प्रति सहानुभूती बाळगणे, उदारमतवादी होऊन इतरांच्या दोषांकडे दुर्लक्ष करुन त्यांच्यातील सद्गुण ग्रहण करणे, सर्वांना समदृष्टीने पाहणे आणि आत्मवत भावनेने इतरांचे दुःखदेखील स्वतःच्या दुःखासमान मानणे यांसह इतरही अनेक मानवी गुणांनी युक्त होण्याची आवश्यकता आहे. माता सुदीक्षाजी यांनी पुढे सांगितले, की मनुष्य स्वतःला धार्मिक समजतो, आपल्या धर्मातील गुरु-पीर-पैगंबरांच्या वचनांचे पालन करण्याचा दावा करतो. आपली कुठेही श्रद्धा असू द्या, प्रत्येक ठिकाणी मानवता हाच खरा धर्म असून ईश्वराशी नाते जोडून आपले जीवन सार्थक करावे अशीच शिकवण दिली गेल्याचे आढळते. जीवन अनमोल आहे. कोणत्याही वयात असलेला मनुष्य ब्रह्मज्ञानी संतांच्या सान्निध्यात येऊन ईश्वराला क्षणार्धात जाणू शकतो.
संत समागमाच्या पहिल्या दिवशी सद्गुरु माता सुदीक्षाजी यांनी आपल्या प्रवचनामध्ये सांगितले, की ईश्वराला कोणत्याही नावाने संबोधित करा. तो सर्वव्यापी असून कणकणवासी आहे. प्रत्येकाचा आत्मा हा निराकार ईश्वराचाच अंश आहे. आम्हाला स्वतःची खरी ओळख करुन घ्यायची असेल तर आधी परमात्म्याची ओळख करुन घ्यावी लागेल. कारण ब्रह्मानुभूतीनेच आत्मानुभूती शक्य आहे. स्थिर प्रभूशी नाते जोडल्याने आपल्याला स्थिरतेबरोबरच शांती व समाधानही लाभते. परमात्मा समस्त विश्वाचा कर्ता-धर्ता आहे. याची अनुभूती झाल्यानंतर प्रत्येक कार्य सहजतेने स्वीकारण्याची युक्ती प्राप्त होते. स्थिर परमात्म्याचा आधार घेतल्याने जीवनातील चढ-उतारांमध्येही समाधानाची अवस्था टिकून राहते. सद्गुरु माताजींनी पुढे प्रतिपादन केले, की आपल्या दैनंदिन जीवनात प्रत्येक स्थितीचे आकलन करण्यासाठी, शरीराचे उचित संचालन करण्यासाठी ज्ञानेंद्रियांचा वापर करावा, मात्र त्यांच्या अधीन होऊ नये. इंद्रिये आपल्या नियंत्रणात असतील तर आपण त्यांचा सदुपयोग करुन घेऊ शकतो. याकरिता इंद्रियांमध्ये गुंतून न जाता त्यांना आपल्या काबूत ठेवायचे आहे.

समागमाच्या दुसऱ्या दिवसाचा प्रारंभ एका रोमहर्षक सेवादल रॅलीने झाला. त्यामध्ये महाराष्ट्राच्या सर्व भागातील सेवादल बंधु-भगिनींनी भाग घेतला. रॅलीमध्ये शारीरिक कवायती व्यतिरिक्त विविध खेळ आणि मल्लखांब, मानवी मनोरे यांसारख्या साहसी करामती दाखविण्यात आल्या. शिवाय मिशनच्या शिकवणूकीवर आधारित लघुनाटिकाही प्रस्तुत करण्यात आल्या. सेवादल रॅलीमध्ये आपला आशीर्वाद प्रदान करताना सद्गुरु माताजी म्हणाल्या, की अवघ्या मानवतेला आपला परिवार मानून, अभिमानाला त्यागून, समयाची गरज लक्षात घेऊन, मर्यादा व अनुशासनामध्ये राहून मिशनकडून वर्षानुवर्षे सेवेचे योगदान दिले जात आहे. सेवा करताना प्रत्येकाला ईश्वराचा अंश मानून सेवा करायला हवी कारण मानवसेवा ही परमात्म्याचीच सेवा होय.दुसऱ्या दिवशी सायंकाळी झालेल्या सत्संग समारोहाला संबोधित करताना सद्गुरु माताजींनी सांगितले, की जीवनात स्थिरता आणण्यासाठी सजगता आणि विवेकाची गरज असते आणि त्यासाठी आपण परमात्म्याला आपल्या हृदयात स्थान देण्याची आवश्यकता आहे. हृदयांतरी ईश्वराचा निवास झाल्यावर मन आपोआपच निर्मळ होते, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या नकारात्मकतेला स्थान उरत नाही. सद्गुरु माताजींनी पुढे सांगितले, की मागील संतांचे दाखले पाहिले तर त्यांनीही हेच सांगितले आहे, की या ईश्वराला खुल्या नयनांनी पाहिले जाऊ शकते. परमात्म्याला पाहिल्यानंतर आपल्याला आपल्या निजस्वरूपाची ओळख होते. आपण शरीर नसून आत्मा आहोत याची जाणीव होते. या बोधाने आपण जीवनाला योग्य दिशा देऊ शकतो. युगानुयुगे संतांनी, भक्तांनी हेच सांगितले, की परमात्म्याशी नाते जोडून भक्तिमार्गाने चालूनच जीवनाचे कल्याण होऊ शकते. तसेच आपला आत्मा बंधनमुक्त होऊन मोक्ष प्राप्त करु शकतो.

समागमाच्या तिसऱ्या दिवसाचे मुख्य आकर्षण होते बहुभाषी कवी संमेलन, ज्याचे शीर्षक ‘स्थिरतेशी नाते मनाचे जोडून, जीवन आपले सहज करुया’ असे होते. या विषयावर आधारित मराठी, हिंदी, सिंधी, गुजराती, पंजाबी आणि भोजपूरी भाषांमधून कित्येक कविंनी आपल्या कविता सादर केल्या. या कवी संमेलनामध्ये जीवनातील अस्थिरतेची कारणे, स्थिरतेची गरज आणि स्थिरतेचे उपाय यावर प्रभावशाली रीतीने कवी सज्जनांनी प्रबोधन केले.
समागमाच्या तिन्ही दिवशी राज्याच्या वेगवेगळ्या भागातील तसेच जवळपासच्या राज्यांसह देशाच्या काही प्रांतांतील व विदेशातील अनेक वक्त्यांनी विविध भाषांतून आपले प्रेरणादायी विचार व्यक्त केले. याशिवाय संपूर्ण अवतार बाणी आणि संपूर्ण हरदेव बाणीतील पावन पदांचे कीर्तन, पुरातन संतांची अभंगवाणी तसेच मिशनच्या गीतकारांनी तयार केलेल्या प्रेरणादायी भक्तीरचना प्रस्तुत करुन मिशनच्या विचारधारेवर आधारित सारगर्भित संदेश प्रसारित करण्यात आला.

Related Posts
-
महाराष्ट्राच्या ५६व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची जय्यत पूर्वतयारी सुरु
नेशन न्यूज मराठी टीम. औरंगाबाद/प्रतिनिधी - महाराष्ट्राच्या 56व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या…
-
भक्तीभाव व समर्पणाने निरंकारी संत समागमाची जय्यत पूर्वतयारी
कल्याण प्रतिनिधी- निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन छत्रछायेखाली महाराष्ट्राचा ५४वा वार्षिक निरंकारी संत समागम दिनांक २६, २७…
-
निरंकारी संत समागमाला मुख्यमंत्री याची सदिच्छा भेट
नेशन न्यूज मराठी टीम. औरंगाबाद/प्रतिनिधी - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
-
संत निरंकारी मंडळाचे प्रधान गोबिन्दसिंह यांचे निधन
जालंदर / प्रतिनिधी - संत निरंकारी मंडळाचे प्रधान तसेच मिशनचे…
-
रक्तटंचाई दूर करण्यासाठी संत निरंकारी मिशनचे निरंतर प्रयत्न
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कोरोना महामारीच्या काळात निर्माण झालेली रक्ताची टंचाई दूर…
-
७६व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची जय्यत तयारी सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी- संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ समालखा…
-
५६वा वार्षिक निरंकारी संत समागम स्वेच्छा सेवांचा शुभारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. औरंगाबाद/प्रतिनिधी - महाराष्ट्राच्या 56व्या वार्षिक निरंकारी संत…
-
संत निरंकारी मिशनच्या मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबिरात २०० नागरिक लाभान्वित
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. नवी मुंबई/प्रतिनिधी - निरंकारी सद्गुरु…
-
संत निरंकारी मिशनने आयोजित केलेल्या २ शिबिरांमध्ये १४९ युनिट रक्तदान
मुंबई प्रतिनिधी- कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली रक्तटंचाई दूर करण्यासाठी सातत्याने…
-
संत निरंकारी मिशनकडून देशभरात ५० हजारहून अधिक यूनिट रक्त संकलित
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी - ’रक्तदान हे केवळ एक सामाजिक…
-
संत निरंकारी मिशनद्वारे आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात ५४ जोडपी विवाहबद्ध
नेशन न्यूज मराठी टीम. हरियाणा/प्रतिनिधी - सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या…
-
संत निरंकारी मिशनने एकाच दिवसात तीन रक्तदान शिबिरांमध्ये ४१४ युनिट रक्तदान
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - संत निरंकारी मिशनची सामाजिक…
-
भक्तिभावपूर्ण वातावरणात ७६व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचा भव्य शुभारंभ
नेशन न्यूज मराठी टिम. हरियाणा/प्रतिनिधी - ‘‘विश्वामध्ये शांतीसुखाचे वातावरण निर्माण…
-
संत निरंकारी मिशनच्या ‘वननेस वन’ परियोजने अंतर्गत कोपरखैरणे येथे ३२४ वृक्षांची लागवड
कल्याण/प्रतिनिधी - संत निरंकारी मिशनच्या ‘वननेस वन’ नागरी वृक्ष समूह परियोजने अंतर्गत…
-
संत निरंकारी मिशनच्या वतीने एक हजार बेड्सचे कोविड-१९ ट्रिटमेंट सेंटर मानवतेसाठी समर्पित
दिल्ली /प्रतिनिधी - संत निरंकारी मिशनच्या वतीने मिशनचे बुराडी रोड, दिल्ली येथील…
-
संत निरंकारी मिशन द्वारे वननेस-वन परियोजनेचा शुभारंभ करत वृक्षारोपण
कल्याण/प्रतिनिधी - भारताच्या ७५व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने संत निरंकारी मिशनद्वारे ‘अर्बन…
-
महाराष्ट्राच्या ५६व्या वार्षिक निरंकारी संत समागमचा भव्य शोभा यात्रेने शुभारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. औरंगाबाद/प्रतिनिधी - “या जगात आपण मानव…
-
निरंकारी संत समागमाच्या दुसऱ्या दिवशी झाली रोमहर्षक सेवादल रॅली
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - ‘’समर्पणाने युक्त आणि अहंभावाने मुक्त असते…
-
निरंकारी सद्गुरु माताजींच्या शुभहस्ते ७५व्या वार्षिक संत समागमाच्या मैदान सेवांचा शुभारंभ
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. हरियाणा/प्रतिनिधी - १६ ते २० नोव्हेंबर, २०२२ या…
-
पत्रकार आणि वैज्ञानिकांना एकत्र आणणारी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाची माध्यम आणि संवादक परिषद
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - फरिदाबादच्या टीएचएसटीआय…
-
७५ व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचा समारोप, महाराष्ट्रातून हजारो भक्तगण सहभागी
नेशन न्यूज मराठी टीम. हरियाणा/संघर्ष गांगुर्डे - ‘स्वतःला शांती व प्रेमाचे…
-
भारत आणि ऑस्ट्रेलिया मध्ये आर्थिक सहकार्य आणि व्यापार करार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी…
-
भारत आणि श्रीलंकेदरम्यानच्या आर्थिक आणि तंत्रज्ञान विषयक सहकार्य करारावरील वाटाघाटींची पुन्हा सुरुवात
नेशन न्यूज़ मराठी ऑनलाइन टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारत आणि…
-
सांस्कृतिक पुरस्कार आणि मानधन योजनेचे नामकरण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - सांस्कृतिक कार्य विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या…
-
खादी आणि ग्रामोद्योग आयोगात पद भरती
पदाचे नाव : संचालक (एकुण पदे १८) शैक्षणिक पात्रता : बी.ई./बी.टेक/सी.ए किंवा…
-
कांदिवलीत ११० निरंकारी भक्तांचे उत्स्फूर्त रक्तदान
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी…
-
भारतीय सिनेमा आणि भारताची सौम्यशक्ती या विषयावर ३ आणि ४ मे रोजी चर्चासत्र
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - आयसीसीआर म्हणजेच सांस्कृतिक संबंधविषयक…
-
निरंकारी भक्तांकडून कल्याणमध्ये 235 युनिट रक्तदान
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - संत निरंकारी…
-
चेंबूर येथील निरंकारी भवनात कोविड लसीकरण केंद्र सुरु तर दादरमध्ये ८१ निरंकारी भक्तांचे रक्तदान
मुंबई /प्रतिनिधी - संत निरंकारी मिशनच्या चेंबूर स्थित मुंबईतील मुख्य…
-
केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाचा खासगी नोकरीविषयक पोर्टल्स, कंपन्या आणि कौशल्य प्रदाते यांच्याशी सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - केंद्रीय…
-
कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्याला राष्ट्रीय पुरस्कार
प्रतिनिधी. मुंबई - स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत केंद्र सरकारच्या पेयजल…
-
निवडणूक कालावधीत ओपिनियन आणि एक्झिट पोलला प्रतिबंध
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारत निवडणूक आयोगामार्फत…
-
ऑनलाइन पोर्टल मुळे खेळाडू आणि प्रशिक्षकांना रोख पुरस्कार आणि अन्य लाभ सुलभरीत्या मिळण्यात होणार मदत
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - डिजिटल इंडियाच्या माध्यमातून …
-
देशातील कर्करोग विषयक संशोधन आणि उपचाराला चालना
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - भारत सरकार देशातील…
-
विठ्ठलवाडी येथे १०० निरंकारी भक्तांचे उत्स्फूर्त रक्तदान
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - आध्यात्मिक जागृतीच्या…
-
मुंबई आणि राजस्थानात इन्कमटॅक्स विभागाच्या धाडी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - इन्कमटॅक्स विभागाने 16.06.2022…
-
भारतीय नौदलाचा तोफा आणि क्षेपणास्त्र परिचालन परिसंवाद संपन्न
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय नौदलाच्या…
-
तापी आणि पूर्णा नदीच्या पुरामुळे पिकांचे नुकसान
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव / प्रतिनिधी - तापी व…
-
नांदेड मध्ये वंचित बहुजन आघाडी आणि शिवसैनिकांचा जल्लोष
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड/प्रतिनिधी - वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय…
-
१४ आणि १५ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशन मुंबईत
प्रतिनिधी. मुंबई - राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या १४ आणि १५…
-
तृतीयपंथीयांसाठी मोलाची कामगिरी करणार - दिशा शेख
संघर्ष गांगुर्डे मुंबई - तृतीयपंथीयांच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक…
-
रोग निदान आणि उपचारासाठी नवपद्धती ‘जिमोनिक्स, झेब्राफिश
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर/प्रतिनिधी - रोग निदान व उपचारासाठी जिनोमिक्स,…
-
सीएसआयआर-एनआयओ आणि बिट्स पिलानी यांच्यात शैक्षणिक करार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. पणजी/प्रतिनिधी - सीएसआयआर-राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था…
-
मुंबईत एनएफडीसी आणि अर्जेंटिना चित्रपट महोत्सवाचे आयोजन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.मुंबई/प्रतिनिधी - भारतीय राष्ट्रीय चित्रपट विकास…
-
डोंबिवलीत काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आले आमने सामने
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी…
-
भारतीय केळी आणि बेबीकॉर्न कॅनडाच्या बाजारपेठेत विक्रीला जाणार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - भारतात उत्पादित केळी आणि…
-
यवतमाळ अगरबत्ती आणि लाखेपासून बांगड्या बनविण्याचे नियोजन
प्रतिनिधी . यवतमाळ, दि. २३ - पुजा करतांना देवासमोर लावण्यात…
-
भारतीय नौदल आणि रॉयल ऑस्ट्रेलियन नेव्ही यांच्यात सागरी युद्ध सराव
नेशन न्यूज मराठी टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी- भारतीय नौदल आणि रॉयल…
-
दुबईत‘प्रसारमाध्यम आणि मनोरंजन सप्ताहाचे’ उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - माहिती आणि प्रसारण…