नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.
पुणे/प्रतिनिधी – आपल्या शरीरातील पाच ज्ञानेंद्रिय म्हणजेच कान, नाक, जीभ,डोळे आणि त्वचा ही अत्यंत महत्वाची आहेत. यापैकी जर कोणतेही ज्ञानेंद्रियांना दुखापत झाली किंवा कमी पडले तरी त्याचा मानवी शरीरावर परिणाम होतो. कानाच्या बाबतीत उद्भवणारी मुख्य समस्या म्हणजे श्रवणशक्ती कमी होणे. त्यामुळे ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. हळूहळू ही समस्या वाढू लागते.
पुण्याच्या कमांड रुग्णालयाच्या कान, नाक आणि घसा विभागाने जन्मजात बाह्य आणि कानाच्या आतील विसंगतींनी ग्रस्त आणि मोठ्या प्रमाणावर श्रवणशक्ती कमी झालेल्या 7 वर्षाच्या मुलामध्ये तसेच एकाच कानाने बहिरेपण असलेल्या (SSD) एका प्रौढ व्यक्तीवर यशस्वी पिझोइलेक्ट्रिक बोन कंडक्शन श्रवण प्रत्यारोपण केले आणि अशाप्रकारचे प्रत्यारोपण करणारे हे रुग्णालय देशभरातील पहिले सरकारी रुग्णालय बनले आहे. महाराष्ट्रासाठीच नाही तर पूर्ण देशासाठी ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.कमांड रुग्णालयाचा ENT विभाग हे AFMS चे नियुक्त न्यूरोटोलॉजी केंद्र आहे. हा विभाग अनेक वर्षांपासून अवलंबित्व असलेल्या ग्राहकांना श्रवणयंत्र बसवत आहे. ऍक्टिव्ह पिझोइलेक्ट्रिक बोन कंडक्शन हियरिंग इम कंडक्टिव्ह (ध्वनिलहरी कर्णपटलापर्यंत न पोहोचणे)/दोन्ही कानाने किंवा एका कानाने बहिरेपणा असलेले असे रुग्णांचे प्रकार आहेत, ज्यांना प्रत्यारोपण किंवा श्रवणयंत्र किंवा कानातील शस्त्रक्रियेने फायदा होत नाही. संबंधित अपंगत्व कमी करण्यासाठी, मुलांमध्ये चांगल्या शैक्षणिक परिणामासाठी आणि प्रौढांमधील सामाजिक जीवनासाठी श्रवणवृद्धी प्रदान करणे अत्यावश्यक आहे. रुग्णांच्या अशा गटांमध्ये त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी बोन कंडक्शन रोपण हा निश्चित श्रवण उपाय आहे आणि सशस्त्र दलाच्या वैद्यकीय सेवांनी हे त्वरित अंमलात आणले.
सशस्त्र दलाच्या वैद्यकीय सेवेचे महासंचालक जनरल दलजीत सिंग आणि डीजीएमएस (लष्कर) लेफ्टनंट जनरल अरिंदम चटर्जी यांनी कमांड रुग्णालयाचे (एससी) अभिनंदन केले आहे आणि संस्थेला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
कर्नल (डॉ) राहुल कुरकुरे, न्यूरोटोलॉजिस्ट आणि इम्प्लांट सर्जन कर्नल (डॉ) नितू सिंग, वरिष्ठ सल्लागार आणि एचओडी (ईएनटी) यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्याच्या कमांड रुग्णालयात (SC)या रूग्णांवर यशस्वी रोपण करण्यात आले. पुण्याचे कमांड रुग्णालय (SC), हे AFMS च्या प्रमुख संस्थांपैकी एक आहे, सध्या मेजर जनरल बी नांबियार यांच्या नेतृत्वाखाली आहे. संपूर्ण AFMS मधील सर्वोत्कृष्ट रुग्णालय म्हणून रुग्णालयाला नुकतेच सर्वात प्रतिष्ठित “रक्षा मंत्री” चषकाने सन्मानित करण्यात आले.