प्रतिनिधी.
अकोला – आईची तिच्या लेकराबद्दल असणारी माया ही जगी सर्वोच्च मानली जाते. आपल्या तान्हुल्यासाठी रायगड किल्ल्याचा धोकेदायक कडा रात्री उतरुन जाणारी हिरकणी असो वा अन्य कुणीही. आपल्या हरवलेल्या लेकराला भेटण्यासाठी गेले सहा महिने अशीच कासावीस झालेल्या एका माऊलीची माया मंगळवारी (दि.७) फळाला आली. तिचं हरवलेलं लेकरु सापडलं. तब्बल सहा महिन्यानी. शासनाच्या बाल कल्याण समितीने हे लेकरु तिच्या स्वाधीन करत या आईच्या ममतेला कुर्निसात केला. आपल्या तान्हुल्याला जवळ घेत या आईने फोडलेला हंबरडा…. उपस्थितांचे डोळे पाणावून गेला. आपल्या लेकराला कडेवर घेऊन जग जिंकल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसून आला.आईची माया ही गरीब, श्रीमंती तसेच कोणतीही भाषा, धर्म, प्रांत अशा कोणत्याही सिमा जाणत नाही. आई ही आई असते आणि तिचं लेकरु तिला सर्वात प्रिय असतं. अशीच ही आई….
दर्यापूर जि. अमरावती इथली. रेखा पवार तिचं नाव. संसाराची कर्तीसवरती. नवरा विजय पवार आणि सोन्यासारखी तीन लेकरं. त्यातलाच एक दीड वर्षाचा सुमित. संसार गरिबीचा. आज इथं तर उद्या तिथं मोलमजूरी करुन गुजराण. दि.१९ फेब्रुवारीची रात्र… हे थकलं भागलं कुटूंब कामासाठी दूरच्या गावी जाण्यासाठी गाडीची वाट पाहत अकोला रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर झोपी गेलं. आईच्या कुशीत गाढ झोपलेल्या ‘सुमित’ ला कुणीतरी दुष्ट व्यक्तीने अलगद उचलून नेलं. आईची झोप ती लेकरु जवळ नाही ही संवेदना तिला लगेच जाणवली. भांबावल्या सारखी उठली. सैरभैर आपल्या तान्हुल्याला शोधू लागली. आख्खं कुटुंब आकांत करु लागलं. नवरा, कच्ची बच्ची सगळी धायमोकलून रडू लागली. प्रकरण पोलिसांत गेलं. शोध सुरु झाला. आई आणि लेकराची ताटातूट त्यात खाण्यापिण्याचे वांदे, एका लेकराचा शोध घ्यावा तर दुसऱ्या कच्च्याबच्च्यांना काय खाऊ घालणार? हा यक्ष प्रश्न. मोल मजुरी केली नाही तर खाणार काय? पोटच्या गोळ्यांना उपाशी कसं ठेवणार? आणि जो आता डोळ्याला दिसत नाहिय तो सुमित.. त्याचं काय? कुठं असंल, कसा असंल…. ‘मन चिंती ते वैरीही न चिंती’… नको नको ते विचार. पण आईची ममता ही जगातली सर्वाधिक सकारात्मक आणि सृजनशील असते. त्याच आईचं मन तिला समजावत होतं.. तुझं लेकरु तुला भेटंल…! ह्या आशेवर दिवसामागून दिवस काढत होती ती. गावात जाऊन मोल मजूरी करायची. जमेल तसं अकोल्याला येऊन पोलीस स्टेशनचे उंबरठे झिजवणं सुरु होतं.या आईची ही तडफड सुरु होती ती तब्बल दि.१६ मे पर्यंत. सुमित नागपूरला सापडला. तिथले बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक खान पठाण ह्या भल्या अधिकाऱ्यानं सुमितला मातृसेवा संघाच्या शिशुगृहात नेलं. तिथं त्याला ताब्यात घेऊन तिथल्या बालकल्याण समितीच्या ताब्यात दिलं. मग पुन्हा तपासाचा उलटा प्रवास. दि.२० मे ला अकोला रेल्वे पोलिसांत निरोप आला. लगेचच रेल्वे पोलिस निरिक्षक शेंडगे यांनी आई वडीलांचा संपर्क करुन तिला तिचं लेकरु सापडल्याची आणि ते सुखरुप असल्याची बातमी दिली. जीव भांड्यात पडला खरा पण लेकरु ताब्यात मिळत नाही आणि त्याला प्रत्यक्ष बघत नाही तोवर ही आई कशी बरी स्वस्थ राहिल? सुमितचा त्याच्या आई वडीलांचा फोटो व आवश्यक कागदपत्र रेल्वे पोलिसांनी नागपूर बाल कल्याण समितीला सादर केले. ओळख पटवणे, आणि न्यायालयाच्या सर्व प्रक्रिया पूर्ण करुन, कायदेशीर सोपस्कार करुन नागपूर आणि अकोला इथल्या बालकल्याण समितीच्या ऑनलाईन बैठका झाल्या. तोवर ह्या माऊलीचे पोलीस स्टेशन, बाल कल्याण समितीचे उंबरठे झिजवणे सुरुच होते. विशेष म्हणजे या काळात कोरोनाच्या साथीमुळं लॉक डाऊन होतं. मिळेल त्या वाहनाने ही माऊली दर्यापूर हून अकोल्याला येत होती. अखेर सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर एका विशेष गाडीने सुमित मंगळवारी (दि.७ जुलै) नागपूर हून अकोल्याला आला. त्याच्या आई वडीलांना अकोल्याच्या बालकल्याण समितीने दर्यापूरहून बोलावलं होतं. गाडीतून तिचं लेकरु अधिकाऱ्यांनी बाहेर आणलं… आणि गेले सहा महिने आपल्या लेकराच्या दर्शनाला आसूसलेली ही माऊली अक्षरशः हंबरडा फोडून रडू लागली. बाप डोळे टिपत होता. तिला सावरु की पोराला बघू असं झालं होतं त्याला. सुमितची भावंडं त्यांना तर बिचाऱ्यांना काही कळतच नव्हतं… हा आनंद कसा व्यक्त करायचा? अखेर माय लेकराची भेट झाली. कित्ती कित्ती पापे घेतले तिनं त्याचे. सहा महिन्यांपासून दुरावलेलं लेकरु आपल्या आईला जे घट्ट बिलगलं, ते कुणाकडे जाईच ना… त्याची भावंडे त्याला ओंजारु गोंजारु लागली, बाप कुरवाळू लागला. हे सगळं बाल कल्याण समितीच्या विधी सेवा केंद्राच्या आवारात घडत होतं. हे दृष्य बघणाऱ्या उपस्थित साऱ्यांचेच डोळे पाणावले होते…. एका माऊलीची ममता जिंकली होती. आणखी एक हिरकणी जिंकली होती… तिचं लेकरू तिच्या कडेवर घेऊन जग जिंकल्याच्या आनंद तिच्या चेहऱ्यावर ओसांडून वाहत होता. ही माय लेकरांची भेट घडविण्यात अनेक सहृद शासकीय अधिकारी आणि बालकल्याण समितीच्या पदाधिकाऱ्यांचा सहयोग लाभला. त्यात बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक खान पठाण, महिला व बालविकास अधिकारी जवादे, बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष सौ. पल्लवी कुलकर्णी, बाल कल्याण समितीच्या सदस्या सौ. प्रीती पळसपगार, संरक्षण अधिकारी सुनील सरकटे तसेच सचिन घा टे आणि पेशवे नागपूर बाल कल्याण समिती, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी ह्या सगळ्यांना त्या आईनं लाख लाख धन्यवाद दिले.

Related Posts
-
राधानगरी धरणाचा दरवाजा बंद करण्यात यश
नेशन न्युज मराठी टीम. कोल्हापूर- राधानगरी धरणाचा दरवाजा बंद करण्यात…
-
किकबॉक्सिंग स्पर्धेत टिटवाळयातील खेळाडूंचे यश
कल्याण/प्रतिनिधी - ठाणे जिल्हा किकबॉक्सिंग असोसिएशन आणि फ्रॅपर फोर्ट यांच्या संयुक्त…
-
परदेशी व्यापार धोरणाची मर्यादा सहा महिने वाढवली
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - सरकारला निर्यात प्रोत्साहन…
-
जखमी माकडाला वाचविण्यात वॉर संस्थेला यश
कल्याण/संघर्ष गांगुर्डे- गेले अनेक दिवस डोंबिवली शीळ रोडवरील लेक शोर परिसरात…
-
विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी अंदाजे सरासरी ६९.०८ टक्के मतदान
प्रतिनिधी. मुंबई - महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तीन पदवीधर, दोन शिक्षक आणि…
-
राज्य महिला आयोगात सहा सदस्यांची नियुक्ती; राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या…
-
कोटींच्या नफ्याने नंदुरबार बाजार समितीला केले मालामाल
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नंदुरबार/प्रातिनिधी - खानदेशातून नंदुरबार कृषी…
-
आत्मनिर्भय नौदलाचे यश ;'महेंद्रगिरी' युद्धनौकेचे होणार जलावतरण
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - महेंद्रगिरी…
-
दिवा भागासाठी उद्यापासून अतिरिक्त सहा एमएलडी पाणी
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे - ठाणे महापालिका हद्दीतील दिवा…
-
ठेका रक्कम भरण्यास मत्स्य व्यावसायिकांना सहा महिन्यांची मुदतवाढ
मुंबई/प्रतिनिधी - कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मच्छिमार, मत्स्यसंवर्धक…
-
परदेशी शिष्यवृत्तीच्या अर्ज स्विकृतीला मुदतवाढ - वंचितच्या लढ्याला यश
प्रतिनिधी . मुंबई - अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना मास्टर्स व…
-
सहा वर्षाच्या चिमुकालीची नवरा-नवरी सुळक्यांवरून झिप्लायनिंग
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - इतिहासात पहिल्यांदाचं नवरा-नवरी या…
-
भारतीय तटरक्षक दलाने केरळातून सहा भारतीयांसह इराणची बोट घेतली ताब्यात
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय तटरक्षक…
-
भाजपने सहा ठेकेदारांना महाराष्ट्र विकला, आ. प्रणिती शिंदेंचा गंभीर आरोप
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/DE2_c7qvBkc?si=1TalXyMi8vYJdfXw सोलापूर/प्रतिनिधी - गोरगरीबांचा आरक्षणाचा हक्क…
-
माय माऊलीच्या जन्माचा उत्सव अनवणी पायांना आधार देऊन केला साजरा
सोलापूर/प्रतिनिधी - सोलापूर शहर पोलीस शिपाई शांतीसागर जेनुरे यांनी आपल्या…
-
युपीएससी परीक्षेत सारथीच्या विद्यार्थ्यांना घवघवीत यश
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पुणे/प्रतिनिधी - नुकताच केंद्रीय लोकसेवा…
-
शिक्षण सेवक भरतीला हिरवा कंदिल, सहा हजार पदे लवकरच भरणार
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील सुमारे सहा हजार 100 शिक्षण सेवकांची पदे…
-
राष्ट्रीय स्पर्धेमध्ये ठाणे जिल्हातील खेळाडूंचे घवघवीत यश
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - नुकत्याच रोहतक, हरियाणा येथे स्टुडन्ट ओलंपिक असोसिएशन ऑफ…
-
सहा महिन्याच्या बाळाचे अपहरण करून विक्री करणाऱ्या टोळीला कल्याणात बेड्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. https://youtu.be/Dum3ki5mzMU?si=BkaX9L83kX0LrOAI कल्याण/प्रतिनिधी - मध्य प्रदेश…
-
७४ वर्ष जुनी इमारत कोसळली, तिघांना वाचविण्यात प्रशासनास यश
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव / प्रतिनिधी - जळगाव शहरातील…
-
भिवंडीत गोदाम इमारत कोसळून एकाचा मृत्यू तर सहा जखमी
प्रतिनिधी. भिवंडी -भिवंडीत जिलानी इमारत दुर्घटना ताजी असतांनाच दापोडा ग्राम…
-
सहा महिन्यात लसीकरण पूर्ण करण्याचा राज्य शासनाचा मानस-आरोग्यमंत्री
मुंबई/ प्रतिनिधी - राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील ५ कोटी…
-
बालशक्ती पुरस्कार व बालकल्याण पुरस्कार साठी १५ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
प्रतिनिधी. मुंबई - केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत देण्यात…
-
पालक ओरडतात म्हणून घर सोडले,दोघा अल्पवयीन मुलांना शोधण्यात यश कल्याण पोलिसांची कामगिरी
कल्याण प्रतिनिधी - आई वडील ओरडतात म्हणून घर सोडून गेलेल्या…
-
कल्याणात पोलीस कर्मचाऱ्यासह सहा जणांना बेड्या, बार मध्ये रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवने पडले महागात
कल्याण/प्रतिनिधी - रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत ऑर्केस्ट्राबार मध्ये एका पोलिस कर्मचाऱ्यांसह…
-
डॉक्टरांच्या प्रयत्नाने शस्त्रक्रियेस यश, महिलेच्या पोटातून काढली ११ किलोची कर्करोगाची गाठ
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी -पोटफुगीच्या त्रासाने त्रस्त…
-
दारूची बाटली खाली पडल्याच्या वादावरून डोंबिवलीत एकाची हत्या सहा जणांना अटक
प्रतिनिधी. डोंबिवली - धाब्यावर दारू पीत असताना बाटली खाली पडण्याच्या…
-
सहा महिन्यात नंदुरबार जिल्हा पोलिसांनी अवैध दारूबाबत ७७१ गुन्हेदाखल करत केली दमदार कामगिरी
नेशन न्यूज मराठी टीम. नंदुरबार/प्रतिनिधी - नंदुरबार जिल्हा हा गुजरात…
-
नवी मुंबईत बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट प्रकरणी सहा कंपनी प्रमुखांना अटक
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - सीजीएसटी,…
-
डोंबिवलीतील धक्कादायक घटना, लिफ्टसाठी खोदण्यात आलेल्या खड्डय़ात पडून सहा वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली - बांधकाम सुरु असलेल्या इमारतीमध्ये…
-
एमपीएससी परीक्षेत घवघवती यश मिळवून दिव्यांग माला बनली लाखों विद्यार्थ्यांची प्रेरणा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अमरावती/प्रतिनिधी - 'मेहनत करणे वालो…
-
मुंबई विमानतळावर १२ किलोची सोन्याची बिस्किटे जप्त, सीमाशुल्क विभागाने सहा जणांना केले अटक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागाने…
-
प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत आदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांनी दहावीत मिळवले घवघवीत यश
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कालच दहावीचा (Ssc…
-
राज्यात गेल्या सहा दिवसात ४ लाख ४२ हजार रुग्ण झाले कोरोनामुक्त – आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई/ प्रतिनिधी - कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या सहा दिवसात…
-
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - समाजातील गरीब आणि…
-
प्रादेशिक कौशल्य स्पर्धेत महाराष्ट्राचे घवघवीत यश; ४५ पदकांची कमाई करुन पटकावले अग्रस्थान
मुंबई/प्रतिनिधी - केंद्र शासनामार्फत गांधीनगर (गुजरात) येथे आयोजित करण्यात आलेल्या…
-
कोरोना चाचणीच्या किट निर्मितीत सोलापूरची सुकन्या देतेय योगदान,वर्षभरात सहा युवतींनी मिळून बनवल्या २० लाख कीट
सोलापूर/प्रतिनिधी - देशभरात कोरोना व्हायरसची दुसरी लाट अत्यंत वेगाने पसरत…
-
सहा नद्यांच्या एकत्रीकरणातून जिल्ह्याला ‘सुजलाम सुजलाम’ करण्याचा ध्यास – जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू
अमरावती/प्रतिनिधी - अमरावती जिल्ह्यातील गोदावरी व तापी खोऱ्यातील सहा नद्या केंद्र…