नेशन न्यूज मराठी टीम.
अमरावती – मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत अकोट वन्यजीव विभागातील वान परिक्षेत्रात शनिवारी दि. २ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजताच्या दरम्यान वनवणवा पेटल्याबाबत मेळघाट फायर सेलद्वारे सूचना देण्यात आली. या सूचनेची त्वरित दखल घेण्यात येवून वनवणवा नियंत्रणासाठी प्रयत्न सुरु झाले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व वनकर्मचारी यांच्या अथक परिश्रमाने वणव्यावर रविवारी सकाळी 11 वाजेपर्यंत पूर्ण नियंत्रण मिळविण्यात आले. वाण वन्यजीव परिक्षेत्रातील तलई वर्तुळ, प. तलई बिटमध्ये शनिवारी दि. 2 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजताचे दरम्यान एकूण 4 ठिकाणी वनवणवा पेटल्याबाबत मेळघाट फायर सेलद्वारे सूचना प्राप्त होताच जयोती बॅनर्जी, मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प यांचे मार्गदर्शनात श्री. नवकिशोर रेड्डी, उपवनसंरक्षक, अकोट यांचे नेतृत्वात वणवा नियंत्रणासाठी मोहिम सूरू करण्यात आली.
वणव्यावर त्वरीत नियंत्रण मिळविणे करीता लगतच्या वनविभागासोबत समन्वय साधून आवश्यक मनुष्यबळ त्वरीत उपलब्ध करुन घेण्यात आले. वनवणवा नियंत्रित करण्याकरीता अकोट वन्यजीव विभागातील सोमठाण वनपरिक्षेत्र, वान वनपरिक्षेत्र, सोनाळा वनपरिक्षेत, धारगड वनपरिक्षेत्र, मेळघाट वन्यजीव विभागातील धूळघाट वनपरिक्षेत्र, अकोला वन्यजीव विभाग, बुलढाणा व अकोला प्रोदशिक वनविभागातील सुमारे 150 कर्मचारी व अंगारी मजूर सहभागी होते. याचसोबत वनवणवा क्षेत्र पाहणी करीता व त्याद्वारे कार्यान्वीत कर्मचारी यांना सूचना देण्याकरीता ड्रोनचा वापर करण्यात आला. वनवणवा विझवण्याकरीता फायर ब्लोवर मशीनचा वापर करण्यात आला. याकरीता फायर ब्लोवर मशीन वापरण्यात आल्या. वनक्षेत्र हे डोंगदऱ्यांनी व्याप्तअसल्याने अंगारी चमूना वणवास्थळी पोहचण्यास 3 ते 5 किमी अंतर चालून जाणे आवश्यक असल्याने त्यांना वणवा विझविते वेळी डिहायड्रेशन होऊ नये याकरीता एजेर्झाल टेट्रापॅक व ग्लुकोज बिस्कीट पुरविण्यात आले. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे 200 हे. क्षेत्रात वणवा पसरला असून यामुळे झालेल्या नुकसानीबाबत मोजणी व पंचनामा करण्याची कार्यवाही सुरु आहे.
सदर क्षेत्रात पुन्हा वणवा पेटू नये याकरीता ड्रोनद्वारे लक्ष ठेवण्यात येत असून कर्मचारी व अंगारी देखील गस्त करीत आहेत. संपूर्ण मोहिमेदरम्यान श्री. नवकिशोर रेड्डी, उपवनसंरक्षक, अकोट व श्री. कमलेश पाटील, स.व.स. अकोट हे घटनास्थळी उपस्थित असून आवश्यक ते मार्गदर्शन व मदत उपलब्ध करुन देत आहेत.गुन्हेगारांचा शोध जारी सदर वणवा हा नैसर्गिक पद्धतीने लागलेला नसून हेतुपुरस्पर लावण्यात आल्याचे प्रथम दर्शनी दिसून येते. व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात होणारी अवैध चराई, चोरटी वाहतूक व सालई गोंद तस्करी रोखण्याकरीता करण्यात आलेल्या कार्यवाहीमुळे वणवा लावण्यात आल्याची शक्यता आहे. याकरीता कारणीभूत असलेल्या गुन्हेगारांचा शोध घेण्याकरीता पोलीस गुन्हे शाखा, स्थानिक पोलीस, मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्राईम सेल यांची मतद घेण्यात येत असून आधुनिक पद्धतीचा वापर करुन गुन्हेगारांचा शोध घेणे सुरु आहे. घटनेबाबात अकोला, बुलढाणा व अमरावती जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यांना माहिती देण्यात आली.
याबाबत संपूर्ण स्थितीवर वाय. एल. पी. राव. प्रधान मुख्यवनसंरक्षक (वनबल प्रमुख), सुनील लिमये, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), महाराष्ट्र राज्य व एस.पी. यादव, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण हे लक्ष ठेवून असून मार्गदर्शन करीत आहेत. समाजकंटकाबाबत माहिती दिल्यास बक्षिसे व गोपनीयतेची हमी वनवणव्यामुळे वनांचे नुकसान होऊन त्यामुळे नैसर्गिक साधनसंपतीचा ऱ्हास होऊन वन्यजीव अधिवास नष्ट होणे, पाण्याची उपलब्धता कमी होणे आदी परिणाम होतात. कुणीही व्यक्ती वनवणवा लावणे व इतर बेकायदेशीर कृत्य वनक्षेत्रात करतांना आढळून आल्यास अशा व्यक्तीस पकडण्यास वन विभागास कृपया करुन मदत करा. वने व वन्यजीव यांचे संरक्षण करण्यास सहकार्य करा, आपला मेळघाट वाचवा, असे आवाहन मेळघाट व्याघ्र प्रकल्पातर्फे नागरिकांना करण्यात येत आहे. या प्रकारे माहिती देणाऱ्यास रोख बक्षीस देण्यात येईल तसेच माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे विभागीय वनअधिकारी (संशोधन व वन्यजीव) मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती यांनी कळविले आहे.
Related Posts
-
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला जागतिक मानकाचा दर्जा
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती/प्रतिनिधी - जागतिक स्तरावरील ‘ग्लोबल टायगर…
-
मुंबई तसेच ठाणे क्षेत्रातील शिधावाटप क्षेत्रातील अनाथांना शिधापत्रिकांचे वितरण
मुंबई/प्रतिनिधी - मुंबई व ठाणे शिधावाटप क्षेत्रातील अनाथांना प्राधान्याने शिधापत्रिका…
-
वन कर्मचाऱ्यांचे प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत उपोषण
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - वनविभाग कर्मचाऱ्यांच्या…
-
केडीएमसी क्षेत्रातील अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई सुरूच
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी…
-
हरित ऊर्जा क्षेत्रातील स्टार्टअप्सना मिळणार चालना
मुंबई/प्रतिनिधी - राज्यात स्वच्छ तथा हरित ऊर्जा क्षेत्रातील स्टार्टअप्सना मोठ्या…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वृक्ष गणना सुरु
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या…
-
पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते वेरूळ वन उद्यानाचे लोकार्पण
नेशन न्यूज मराठी टीम. औरंगाबाद - पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी…
-
पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गर्दी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. गोंदिया/प्रतिनिधी - सध्या गोंदिया जिल्ह्यातील…
-
वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ,मंत्रीमंडळाची प्रस्तावाला मान्यता
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/संघर्ष गांगुर्डे - जीव धोक्यात घालून वनांचे…
-
अडीच महिन्यांपासून सुरू असलेले वन मजुरांचे धरणे आंदोलन अजूनही कायम
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड / प्रतिनिधी - वनमजुरांचे कष्टाचे…
-
केडीएमसी क्षेत्रातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीचे आंदोलन
नेशन न्युज मराठी टीम. https://youtu.be/HqYjeMxLNv0 कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण डोंबिवली महानगरपालिका…
-
विद्यार्थ्यांना मिळणार रिटेल उद्योग क्षेत्रातील कौशल्य प्रशिक्षण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ…
-
शून्य सर्पदंश मृत्यू प्रकल्पाच्या मिशन इम्पॉसिबल माहितीपटाचे अनावरण
मुंबई/प्रतिनिधी - ग्रामीण भागात सर्पदंश ही आजही एक मोठी समस्या आहे.…
-
केडीएमसी क्षेत्रातील दुकानाचा,आस्थापनेचा नामफलक मराठीत लावण्याचे निर्देश, अन्यथा होणार कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - शासनाच्या सूचनेनुसार कल्याण डोंबिवली…
-
वन विभागाच्या पदभरती प्रक्रियेत गैरप्रकार आढळून आल्यास उमेदवारांनी तक्रार नोंदविण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - वन विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयातील…
-
दिलासादायक बातमी,केडीएमसी क्षेत्रातील निर्बंध झाले शिथिल
कल्याण/प्रतिनिधी - राज्य सरकारने केलेल्या घोषणेनुसार कल्याण डोंबिवलीतील कोवीड निर्बंधही…
-
भारतीय वन सेवेच्या प्रोबेशनर्सनी घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय वन सेवेच्या…
-
फ्लेमिंगो अधिवास संरक्षणासाठी उचित कार्यवाही करणेच्या नमुंमपामार्फत वन विभागास सूचना
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई - नवी मुंबई महानगरपालिका…
-
महाराष्ट्राला खनिज क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी राष्ट्रीय खनिज विकास पुरस्कार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली- खनिज क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी…
-
आरेकडून वन विभागास मिळाला ८१२ एकर जागेचा ताबा,मुंबईच्या मधोमध फुलणार जंगल
मुंबई/प्रतिनिधी - संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळची आरेची जागा वनासाठी राखीव ठेवून…
-
तलाठी परीक्षा घोटाळ्यातील आरोपीच्या मोबाईल मध्ये आढळल्या वन विभागाच्या ही प्रश्न पत्रिका
नेशन न्यूज मराठी टिम. https://youtu.be/jx4K1D2gC3M?si=HKrWt2Q0yIFKtH4I नाशिक/प्रतिनिधी- नाशिक मध्ये काही दिवसांपूर्वी…
-
केडीएमसी क्षेत्रातील इलेक्ट्रीक, हार्डवेअर दुकाने ७ ते ११ वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी
कल्याण प्रतिनिधी - तोक्ते चक्र वादळांमुळे शहरातील बऱ्याच घरांचे नुकसान…
-
सार्वजनिक, खाजगी क्षेत्रातील संस्था, कंपन्यांनी मनुष्यबळाची माहिती ३१ ऑगस्टपर्यंत सादर करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - मुंबई शहर जिल्ह्यातील सार्वजनिक व…
-
संत निरंकारी मिशन द्वारे वननेस-वन परियोजनेचा शुभारंभ करत वृक्षारोपण
कल्याण/प्रतिनिधी - भारताच्या ७५व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने संत निरंकारी मिशनद्वारे ‘अर्बन…
-
मुख्यमंत्री यांनी केली ट्रान्सहार्बर लिंक प्रकल्पाच्या कामांची पाहणी
मुंबई प्रतिनिधी - ट्रान्सहार्बर लिंक (मुंबई पारबंदर प्रकल्प) प्रकल्पांच्या कामांची…
-
नवी मुंबई मनपा क्षेत्रातील दिव्यांगांना कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये विशेष अनुदान
नवीमुंबई /प्रतिनिधी - नवी मुंबई महानगरपालिका ईटीसी अपंग शिक्षण प्रशिक्षण…
-
शेतकऱ्याच्या राहत्या घरात घुसला बिबट्या,वन विभागाच्या १० तास प्रयत्नानंतर बिबट्या जेरबंद
नेशन न्यूज न्मराठी टीम. https://youtu.be/iEbvT1nJEyg शहापूर/प्रतिनिधी - एका शेतकऱ्याच्या राहत्या…
-
फोर्स वन हद्दीतील आदिवासी पाड्यांचे म्हाडामार्फत कालबद्धरितीने पुनर्वसन करण्याचे मुख्यमंत्री यांचे निर्देश
मुंबई/प्रतिनिधी - गोरेगाव पूर्व येथे गृहविभागाच्या फोर्स वन विशेष सुरक्षा…
-
केडीएमसीच्या रिंगरूट प्रकल्पाच्या अंतिम टप्प्याच्या कामाला गती,६०० मीटर प्रलंबित रस्त्याचा प्रश्न मार्गी
कल्याण प्रतिनिधी - महापालिका क्षेत्रात सतत होणा-या वाहतूक कोंडीवर उपाययोजना…
-
‘नैना’ क्षेत्रातील बांधकामांना रेरा आधी सिडकोची परवानगी घेणे अनिवार्य
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई – नवी मुंबई विमानतळ प्रभावित अधिसूचित…
-
उच्च शिक्षण क्षेत्रातील सर्वंकष क्रमवारीत महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - उच्च शैक्षणिक क्षेत्रातील सर्वंकष…
-
कोरोनाच्या उपाययोजनांसाठी शासनाच्या आवाहनाला खासगी क्षेत्रातील कंपन्यांकडून प्रतिसाद- आरोग्य मंत्री राजेश टोपे
मुंबई- कोरोनाच्या उपाययोजनांसाठी राज्य शासन आवश्यक त्या खबरदारीच्या उपाययोजना करीत…
-
चार ते पाच दिवसात प्रतिबंधित क्षेत्रातील लोकसंख्येचे सर्वेक्षण पूर्ण करा – ठाणे महापालिका आयुक्तांचे आदेश
प्रतिनिधी . ठाणे - महापालिकेने घोषित केलेल्या प्रतिबंधित क्षेत्रातील लोकसंख्येचे…
-
संरक्षण क्षेत्रातील निवृत्तीवेतनधारकांनी वार्षिक ओळखपत्रांची पूर्तता २५ जून पर्यंत पूर्ण करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - संरक्षण…
-
हरित उर्जा क्षेत्रातील संधी शोधासाठी, एनटीपीसी ग्रीन एनर्जी कंपनीचा नायरा एनर्जी समवेत सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - एनटीपीसी…
-
कुनो राष्ट्रीय उद्यानातल्या चित्त्यांचा मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष- राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - दक्षिण आफ्रिका आणि…
-
जगात क्रीडा क्षेत्रातील अव्वल १० देशांमध्ये भारताला स्थान मिळवून देण्यासाठी ‘टीम इंडिया’ म्हणून काम करूया - अनुराग ठाकूर
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. केवडिया - केंद्रीय युवा व्यवहार आणि…