नेशन न्यूज मराठी टीम.
नवी दिल्ली / प्रतिनिधी – महेंद्रगिरी या प्रोजेक्ट 17A श्रेणीतील शेवटच्या युद्धनौकेचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या पत्नी डॉ. सुदेश धनखड यांच्या हस्ते 1 सप्टेंबर 23 रोजी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड, मुंबई इथे जलावतरण केले जाईल.
महेंद्रगिरी हे नाव ओरिसा राज्यात स्थित पूर्व घाटातील पर्वत शिखरावरून देण्यात आले असून प्रोजेक्ट 17A श्रेणीतील सातवी युद्धनौका आहे. या युद्धनौका प्रोजेक्ट 17 श्रेणी (शिवालिक श्रेणी) मधील असून त्यामध्ये सुधारित स्टेल्थ वैशिष्ट्ये, प्रगत शस्त्रे आणि सेन्सर्स आणि प्लॅटफॉर्म व्यवस्थापन प्रणाली आहेत. नव्याने नामकरण केलेली महेंद्रगिरी ही तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगत युद्धनौका आहे आणि स्वदेशी संरक्षण क्षमतेच्या भविष्याकडे वाटचाल करत असताना ती समृद्ध नौदल वारसा अंगिकारण्याच्या भारताच्या निर्धाराचे प्रतीक आहे.
प्रोजेक्ट 17A कार्यक्रमांतर्गत, माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड कडून एकूण चार जहाजे आणि जीआरएसई कडून तीन जहाजांची निर्मिती केली जात आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड आणि जीआरएसई यांनी 2019-2023 दरम्यान टायर केलेल्या या श्रेणीतील सहा युद्धनौकांचा आतापर्यंत नौदलाच्या ताफ्यात समावेश करण्यात आला आहे.
युद्धनौका डिझाइन क्षेत्रातील अग्रणी संस्था असलेल्या भारतीय नौदलाच्या युद्धनौका डिझाईन ब्युरोने प्रोजेक्ट 17A जहाजांची रचना केली आहे. ‘आत्मनिर्भारते’च्या देशाच्या दृढ वचनबद्धतेला अनुरूप, प्रकल्प 17A जहाजांच्या उपकरणे आणि प्रणालींसाठी 75% सामग्री स्वदेशी कंपन्यांकडून खरेदी करण्यात आली आहेत, ज्यात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) यांचा समावेश आहे. महेंद्रगिरी युद्धनौकेचा नौदलाच्या ताफ्यात समावेश होणे भारताने, आत्मनिर्भर नौदलाच्या उभारणीत केलेल्या अतुलनीय प्रगतीचे एक उत्तम उदाहरण आहे.