महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image इतर

मा.नगरसेवक कुणाल पाटील यांच्या पाठपुराव्याला यश, कल्याण ग्रामीण मध्ये रस्त्याच्या कामाला सुरुवात

कल्याण/संघर्ष गांगुर्डे– केडीएमसी क्षेत्रातील रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न हा सगळीकडेच गाजत होता त्यातच कल्याण ग्रामीण मधील रस्त्यांची अवस्था फार भयानक झाली आहे. या खड्ड्यानमुले नागरीक मेटाकुटीला आले आहेत, त्यातच मागील काही दिवस 27 गावाच्या अंतर्गत रस्त्यासाठी मा. नगरसेवक कुणाल पाटील पाठपुरावा करत होते एकंदरीत पाहता 27 गावाच्या रस्त्याची अवस्था फार बिकट झाली आहे .त्यामुळे नागरिकांना खूप मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. खराब रस्त्यांमुळे अनेक अपघात घडत आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. या साठी कुणाल पाटील सतत प्रशासनाकडे पाठपुरावा करत होते. त्याच बरोबर वेळ आली तेव्हा त्यांनी आंदोलनही केले आहे .आणि त्यांच्याच आंदोलनाची दखल प्रशासनेने घेतली असून कल्याण ग्रामीण मधील प्रथम द्रारली गावाच्या कामाची सुरुवात झाली आहे.व इतरही रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. त्यामुळे कुणाल पाटील यांनी प्रशासनाचे अभिनंदन करत आभार मानले आहे. त्यांनी या कामाची पाहणी केली.या वेळी चेतन पाटील,पंडित पाटील,मुरलीधर राणे,सुनिल  चीकनकर,हरदीप पाटील व गावकरी उपस्थित होते 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×