महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
लोकप्रिय बातम्या शिक्षण

विश्व विपश्यना पॅगोड्याला केडीएमसी शाळेच्या विद्यार्थ्यांची भेट,सहलीचा आनंद लुटत घेतले ध्यान साधनेचे धडे

नेशन न्यूज मराठी टीम.

https://youtu.be/-jTad7Shg1M

मुंबई/संघर्ष गांगुर्डे – मुंबई मधील गोराई परिसरात उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठा विश्व विपश्यना पॅगोड्याला कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांनी नुकतीच भेट देत तेथे 70 मिनिट आनापान सती ध्यान साधनेचा अभ्यास करत सहलीचा आनंदही लुटला.

वर्षभर अभ्यास करायचा मेहनत करायची आणि परीक्षेच्या वेळी समोर पेपर आला की , अनेक विद्यार्थ्यांना घाम फुटतो तर अनेकांना अभ्यास काय केला हे विसरून जातात अशा अनेक नकारात्मक समस्यावर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि विपश्यना विश्व विद्यापीठ इगतपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने मित्र उपक्रम अंतर्गत शाळा सुरू होताच आणि शाळा सुटताना 10 मिनिटं आनापान सती ध्यान साधनेचा विद्यार्थाकडून सराव केला जातो. केडीएमसीच्या शाळेत मागील काही महिन्या पासून विद्यार्थी शाळेत ध्यान साधनेचा अभ्यास करत आहेत .त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वेगळीच उर्जा दिसत आहे.

एप्रिल महिन्यात शालेय विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा असल्याने विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग ही तणावात असतात यावर मात करण्यासाठी पालिका आयुक्त डॉ भाऊसाहेब दांगडे यांच्या आदेशानुसार उपायुक्त स्वाती देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिक्षणाधिकारी विजय सरकटे यांच्या पुढाकाराने केडीएमसी शिक्षण मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या शाळेच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांची मुंबई मधील गोराई परिसरात उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठा विश्व विपश्यना पॅगोड्याला 28 , 29 आणि 30 मार्च रोजी जवळपास 3 हजार विद्यार्थी आणि 200 शिक्षकांनी सहलीच्या माध्यमातून भेट देत पगोडा पाहणी करत , 70 मिनिट आनापान सती ध्यान साधनेचा प्रत्यक्ष अभ्यास केला .

अनेक शिक्षक आणि विद्यार्थ्यांना सहली बाबत उत्सुकता होती सहल कुठे जाणार म्हणून , अनेक शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी सांगितले की एकाच जागेवर 70 मिनिट आयुष्यात कधीच बसलो नाही आणि ते आज अशक्य प्राय आज काम केले असून पुढील आयुष्यात आम्हाला फायदेशीर असल्याचे सांगितले तर अनेकांनी सहल आयोजित केल्या बद्दल पालिका आयुक्त डॉ भाऊसाहेब दांगडे आणि शिक्षणाधिकारी विजय सरकटे यांचे आभार मानले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×