महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ठाणे मुख्य बातम्या

भिवंडीतील राहनाळ जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न

भिवंडी/प्रतिनिधी – सध्या राज्यातील कोरोना संकट आटोक्यात आले असल्याने राज्य शासनाने इयत्ता पाचवी ते पुढील वर्गाच्या शाळा सुरु केल्या असून सोमवारी तब्बल दिड वर्षानंतर विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली. भिवंडीतील जिल्हा परिषद शाळा राहनाळचे मुख्यध्यापक अजय पाटील यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस प्रवेशोत्सव म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना कोरोना नियमांचे पालन करून शाळेपयोगी साहित्य वाटप करत गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत करण्यात आले. यावेळी राहनाळ गावचे सरपंच राजेंद्र मढवी, भिवंडी पंचायत समितीच्या माजी सभापती व सदस्य ललिता पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी संजय अस्वले, ग्राम विस्तार अधिकारी अनिल पाटील, ग्रामपंचायत सदस्य किरण नाईक, संदीप नाईक, पंकज पाटील, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष प्रमिला कडू, सदस्य प्रतिभा नाईक आदी उपस्थित होते.           

मागील दीड वर्षानंतर जिल्हा परिषद शाळेतील मुले प्रथमतःच शाळेत आलेली आहेत. या मुलांनी आपला भविष्यकाळ उज्वल करावा, शाळेचे त्याचबरोबर गावाचं नाव मोठे करावे अशा शुभेच्छा यावेळी राहनाळ गावचे सरपंच राजेंद्र मढवी यांनी विद्यार्थ्यांना दिल्या . राहनाळ जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पाचवी ते सातवी पर्यंतचे वर्ग सोमवार पासून सुरु करण्यात आले असून शाळेत प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांचा थर्मामीटर, ऑक्सिजन लेवल चेक करून सॅनिटायझरने हात स्वच्छ करत विद्यार्थ्यांचे स्वागत कंपास बॉक्स, गुलाबपुष्प, आणि चॉकलेट देऊन करण्यात आले. शाळेमध्ये सर्वत्र कोरोनाचे नियम पाळावेत, आपला अभ्यास कसा करावा यासाठी छोटे छोटे बॅनर लावण्यात आले. या प्रसंगी आयोजित केलेल्या प्रवेशोत्सव कार्यक्रमाप्रसंगी शिक्षिका अनघा दळवी, संध्या जगताप, रसिका पाटील, चित्रा पाटील आदी शिक्षिका उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्यध्यापक अजय पाटील यांनी तर आभार प्रदर्शन अनघा दळवी यांनी केले.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »