नेशन न्यूज मराठी टीम.
सोलापूर / प्रतिनिधी – शिक्षणासाठी अनेकदा विद्यार्थ्यांना आपले राहते घर , शहर सोडून उत्तम शिक्षण सुविधा असलेल्या शहरात स्थलांतरीत व्हावे लागते. अश्या दूर शहरात वाजवी किमतीत वसतिगृहात राहणे विद्यार्थी पसंद करतात. परतू वाढत्या महागाईचा फटका या विद्यार्थ्यानाही बसतो.
सोलापुरातील जवाहरलाल नेहरू वसतिगृहाची भाडेवाढ़ प्रशासनाकडून करण्यात आली आहे. त्याच्याविरोधात जिल्हा परिषद इमारतेसमोर विद्यार्थ्यांकडून निषेध आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी जिल्हा परिषद प्रशासनाच्या विरोधात विद्यार्थ्यांकडून जोरदार घोषणाबाजी ही करण्यात आली. जिल्हा परिषद प्रशासनाने वसतिगृहाची भाडेवाढ़ मागे नाही घेतली तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.