Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
Default Image मुख्य बातम्या व्हिडिओ

सोलापुरात शहर आणि जिल्ह्यात विकेंड लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी

सोलापूर/प्रतिनिधी– कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सोलापूर शहर आणि जिल्ह्यात विकेंड लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू झाली आहे. शहर प्रशासनानें आणि जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आदेशाची कडक अंमलबजावणी शहर आणि ग्रामीण पोलीस दल करत आहे. विनाकारण बाहेर आणि मोकाट फिरणाऱ्या वाहन धारकांवर दंडात्मक कारवाई करत त्यांचे वाहन जप्त केले जात आहे. फक्त अत्यावश्यक सेवांना मुभा देण्यात आली आहे. झपाट्याने वाढ होत असलेल्या कोरोना विषाणूचा कहर कमी करण्यासाठी शहर आणि जिल्ह्यात 30 एप्रिल पर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे.

दुचाकी वाहनावर डबल सीट फिरण्यास मनाई-
शनिवारी आणि रविवारी विकेंड लॉकडाऊन सुरू झाले आहे. एकीकडे कोरोना महामारीने थैमान घातले आहे. तर दुसरीकडे नागरिकांचा हलगर्जीपणा देखील यास कारणीभूत ठरत आहे. शासन ही महामारी रोखण्यासाठी सोलापुरात विविध उपाययोजना करत आहे. 5 एप्रिल पासून सोलापुरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद केले आहेत. तर शहर आणि जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीत दुचाकी वर डबल सीट फिरण्यास मनाई करण्यात आली आहे.

शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली-
शुक्रवारी सायंकाळी सोलापूर ग्रामीण भागात 741 पॉजीटिव्ह रुग्ण आढळले आहेत.त्यामध्ये पुरुष 475 आणि स्त्रिया 266 याना कोरोनाची लागण झाली आहे. सोलापूर शहरात शुक्रवारी 247 कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामध्ये 122 पुरुष आहेत तर 125 स्त्रिया आहेत.शुक्रवारी एकाच दिवशी सोलापूर ग्रामीण भागात कोरोना आजाराने 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर शहरी भागात 14 रुग्ण कोरोना आजाराने दगावले आहेत. वाढत मृत्यु दर आणि वाढती रुग्ण संख्या रोखण्यासाठी प्रशासन कडक नियम लागू करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X