महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image लोकप्रिय बातम्या शिक्षण

विशिष्ट दुकानातून शालेय वस्तू गणवेश खरेदीची सक्ती करणाऱ्या शाळांवर होणार कठोर कारवाई

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील खाजगी शाळांकडून पालकांवर सक्ती केली जाते. . शाळांनी सुचविलेल्या विशिष्ट दुकानातूनच शालेय साहित्य खरेदी करा मात्र पालकांवर शाळांना अशी सक्ती करता येणार नाही आदेशाचे पत्र महापालिकेच्या शिक्षण विभागाचे प्रशासकीय अधिकारी विजय सरकटे यांनी काढले आहेत.गणवेष ,बुटमोज इ. साहित्यांची खरेदी करण्यास पालकांना सक्ती करणेबाबतची तक्रारी सामाजिक कार्यकर्ते तसेच पालकांकडून महापालिकेच्या शिक्षण विभागाला आल्या होत्या त्यानंतर हे आदेश काढण्यात आले आहेत.

विद्यार्थ्यांना लागणारी पुस्तके, शालेय साहित्य, गणवेश आदी शाळेने सुचविलेल्या विशिष्ट दुकानातूनच घ्या. तसेच काही शाळांनी तर शालेय साहित्य विक्री करणारे दुकाने शाळेच्या शेजारी शाळेच्या आवारात थाटली आहेत. शाळेकडून सुचविलेल्या दुकानदार हे जास्तीच्या किंमतीत शालेय साहित्य विकतात. व जास्त किमतीत असणारे शालेय साहित्य सर्व सामान्य पालकांना परवडणारे नसते. पण शाळेने सागितल्यामुळे नाईलाजाने पालकांना ते घ्यावे लागते.त्याचबरोबर काही वेळेत त्यांच्याकडे गणवेश, शालेय साहित्य आणि पाठयक्रमातील पुस्तके शाळेने सुचविलेल्या दुकानात उपलब्ध नसतात.त्यामुळे पालकांना त्या दुकानात हेलपाटे मारावे लागतात व दुसऱ्या अन्य दुकानात उपलब्ध असतानाही पालकांना खरेदी करता येत नाही.

महाराष्ट्र शासन निर्णय दिनांक 11 जून 2004 नुसार शाळांतील विद्यार्थ्यांना गणवेश किंवा शैक्षणिक साहित्यशाळेच्या भांडारातून किंवा संस्था/ शाळा सांगेल त्या विशिष्ट दुकानांतूनच खरेदी करण्याबाबतची सक्ती पालकांवर विद्यार्थ्यांवर प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या करता येणार नाही.या नियमानुसार केडीएमसी शिक्षण विभागाने असी सक्ती कोणत्या शाळेत चालू असेल तर त्यांनी ती त्वरित बंद करण्याचे आदेश पत्रद्रारे काढले आहेत.त्याच बरोबर शासनाच्या निर्णयानुसार शासनाचे आदेशाचे पालन शाळांकडून न झाल्यास शासन नियमांनुसार संबंधित शाळांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही महापालिकेच्या शिक्षण विभागाचे प्रशासकीय अधिकारी विजय सरकटे यांनी शाळांना दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×