महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
महत्वाच्या बातम्या मुंबई

कोरोना पार्श्‍वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्ताचे सक्त कारवाईचे आदेश

मुंबई प्रतिनिधी– कोविड-१९ विषाणूचा संसर्ग पूर्णपणे नियंत्रणात येत असतानाच मागील काही दिवसांत रुग्‍ण संख्‍या वाढत असल्‍याने संपूर्ण यंत्रणेने सतर्क राहणे गरजेचे आहे. वाढती रुग्‍ण संख्‍या पाहता घरी विलगीकरण राहणाऱयांच्‍या हातावर शिक्‍के मारावेत, त्‍यांनी नियम मोडला तर त्‍यांच्‍यावर गुन्‍हे दाखल करावेत. लग्‍न समारंभ आयोजनाचे नियम मोडणाऱया आयोजकांसह व्‍यवस्‍थापनांवरही गुन्‍हे दाखल करावेत. मास्‍कचा उपयोग न करणाऱया नागरिकांवर कारवाई करण्‍यासाठी उपनगरीय रेल्‍वे गाड्यांमध्‍ये ३०० मार्शल्‍स नेमावेत तसेच मुंबईतील मार्शल्‍सची संख्‍या दुप्‍पट करावी, पाचपेक्षा अधिक बाधित रुग्‍ण आढळणाऱया इमारती प्रतिबंधित (सील) कराव्‍यात, यासह विविध सक्‍त सूचना महानगरपालिका आयुक्‍त श्री. इकबाल सिंह चहल यांनी केल्‍या आहेत.

कोविड-१९ अर्थात कोरोना विषाणूचा धोका अद्याप पूर्णपणे टळलेला नसून कोरोनाच्‍या नवीन विषाणूने जगातील काही देशांत हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. मुंबईसह महाराष्‍ट्रात कोविड प्रतिबंधात्‍मक लसीकरण वेगाने सुरु असतानाच मागील काही दिवसांत कोविड रुग्‍णांची संख्‍या पुन्‍हा वाढू लागल्‍याने मुख्‍यमंत्री श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वांना सावधगिरी बाळगण्‍याचे निर्देश दिले आहेत.

या पार्श्‍वभूमीवर बृहन्‍मुंबई महानगरपालिका आयुक्‍त श्री. इकबाल सिंह चहल यांनी आज (दिनांक १८ फेब्रुवारी २०२१) महानगरपालिकेचे सर्व अतिरिक्‍त आयुक्‍त, परिमंडळीय सहआयुक्‍त, उपआयुक्‍त, सर्व विभाग कार्यालयांचे सहायक आयुक्‍त तसेच संबंधित अधिकारी यांच्‍यासमवेत दूरदृश्‍य प्रणाली (व्हिडिओ कॉन्‍फरन्‍स) द्वारे बैठक घेतली. त्‍यावेळी आयुक्‍त श्री. चहल यांनी परिस्थितीचा आढावा घेवून यंत्रणेला आवश्‍यक ते निर्देश दिले.

यावेळी आयुक्‍त श्री. चहल म्‍हणाले की, जून-जुलै २०२० मधील स्थितीच्‍या तुलनेत आजही कोविड १९ संसर्गाची स्थिती नियंत्रणात आहे. असे असले तरी कोविडचे रुग्‍ण वाढत असल्‍याने यंत्रणेने दक्ष राहणे आवश्‍यक आहे. जनजीवन पूर्वपदावर येत असताना नागरिकांनी कोविड १९ प्रतिबंधात्‍मक निर्देशांचे पालन करणे आवश्‍यक आहे, कारण कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. नियमांचे पालन होत नसल्‍यास अधिक कठोरपणे कारवाई करुन वेळीच संसर्गाला अटकाव होणे आवश्‍यक आहे, असे सांगून आयुक्‍तांनी वेगवेगळ्या सूचना केल्‍या. त्‍या पुढीलप्रमाणेः

१) लक्षणे आढळत नसलेल्‍या बाधित (असिम्‍प्‍टोमॅटिक) रुग्‍णांना घरी विलगीकरण (होम क्‍वारंटाईन) करण्‍यात येते. अशा रुग्‍णांवर पूर्वीप्रमाणे हातावर शिक्‍के मारण्‍यात यावेत. तसेच त्‍यांची माहिती संबंधित सोसायटींना कळवावी. वॉर्ड वॉर रुम्‍सच्‍या माध्‍यमातून त्‍यांच्‍यावर बारकाईने नजर ठेवावी. अशा व्‍यक्तिंना दिवसातून ५ ते ६ वेळा दूरध्‍वनीवर संपर्क साधून ते घरी असल्‍याची खातरजमा करावी. बाधित व्‍यक्तिंची योग्‍य माहिती ठेवून त्‍यांच्‍या नजीकच्‍या संपर्कातील व्‍यक्तिंचे विलगीकरण करावे. असिम्‍प्‍टोमॅटिक रुग्‍णाचा घरातील विलगीकरण (होम क्वारंटाईन) कालावधी पूर्ण होण्‍याआधी रुग्ण घराबाहेर पडला, सार्वजनिक ठिकाणी फिरला तर त्‍याची माहिती सोसायट्यांनी महानगरपालिकेच्‍या वॉर्ड वॉर रुमला कळवावी. वॉर्ड वॉर रुमने अशा रुग्‍णांवर गुन्‍हे दाखल करण्‍याची कार्यवाही करावी. तसेच अशा रुग्‍णांना सक्‍तीने संस्‍थात्‍मक विलगीकरण (इन्‍स्‍ट‍िट्यूशनल क्‍वारंटाईन) करावे.

२) ज्‍या रहिवासी इमारतींमध्‍ये पाचपेक्षा अधिक रुग्‍ण आढळतील, अशा निवासी इमारती प्रतिबंधित (सील) करण्‍यात येतील.

३) लग्‍न समारंभाची मंगल कार्यालये, जिमखाना/क्‍लब्‍ज, नाईट क्‍लब्‍ज, उपहारगृहं, चित्रपटगृहं, सर्वधर्मिय स्‍थळं, खेळाची मैदाने व उद्याने, सार्वजनिक ठिकाणे, शॉपिंग मॉल, तसेच सर्व खासगी कार्यालये अशा सर्व ठिकाणी मास्‍कचा वापर बंधनकारक आहे. मास्‍कचा वापर होत नसल्‍याचे आढळल्‍यास आणि ५० पेक्षा अधिक व्‍यक्‍ती एकावेळी आढळल्‍यास संबंधित व्‍यक्तिंना दंड करण्‍यासोबत त्‍या-त्‍या ठिकाणच्‍या आस्‍थापनांवर, व्‍यवस्‍थापनांवर गुन्‍हे दाखल करण्‍यात यावेत.

४) लग्‍नसोहळ्यांचे आयोजन होणारे सभागृह, मंगल कार्यालये येथे नियमितपणे तपासणी करावी. दररोज अशाप्रकारच्‍या किमान ५ जागांवर धाड टाकून तपासणी करावी. तिथे कोणत्‍याही नियमांचे उल्‍लंघन झालेले असेल तर दंडात्‍मक कारवाई करुन लग्‍नाचे आयोजक/पालक तसेच संबंधित व्‍यवस्‍थापनांवर देखील गुन्‍हे दाखल करावेत.

५) मास्‍कचा योग्‍यरित्‍या उपयोग न करणाऱया तसेच सार्वजनिक जागी थुंकणाऱया नागरिकांवर कारवाई करण्‍यासाठी मुंबईत सध्‍या कार्यरत असलेल्‍या २,४०० मार्शल्सची संख्‍या दुपटीने वाढवून ती ४,८०० इतकी करावी. विना मास्‍क फिरणाऱयांवर जरब बसवणे आवश्‍यक आहे. त्‍यादृष्‍टीने सध्‍या होत असलेली सरासरी १२ हजार ५०० नागरिकांवरील कारवाईची संख्‍या वाढवून दररोज संपूर्ण मुंबईत मिळून किमान २५ हजार नागरिकांवर दंडात्‍मक कारवाई करण्‍यात यावी.

६) मुंबईतील पश्चिम, मध्‍य आणि हार्बर उपनगरीय रेल्‍वे सेवांच्‍या गाड्यांमध्‍ये विना मास्‍क प्रवास करणाऱयांवर कारवाई करण्‍यासाठी प्रत्‍येकी लाईनवर १०० यारितीने एकूण ३०० मार्शल्‍स नेमून विनामास्‍क प्रवास करणाऱयांवर कारवाई करावी.

७) विनामास्‍क फिरणाऱयांवर कारवाई करण्‍यासाठी आता पोलिसांनाही अधिकार देण्‍यात येत असून पोलीसदेखील मार्शल म्‍हणून नागरिकांना दंड आकारुन कारवाई करु शकतील.

८) बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या मालकीच्‍या सर्व इमारती, कार्यालये, रुग्‍णालये आदी‍ ठिकाणी आवश्‍यकतेनुसार महानगरपालिकेच्‍या शिक्षकांची नियुक्‍ती करुन त्‍यांना विना मास्‍क फिरणाऱयांवर दंडात्‍मक कारवाई करण्‍याचे अधिकार देण्‍यात येतील.

९) सर्वधर्मिय प्रार्थनास्‍थळांच्‍या जागी पुरुषांप्रमाणेच महिला मार्शल नेमून नियमांचे तेथे पालन होत असल्‍याबाबत लक्ष ठेवण्‍यात येईल. विना मास्‍क फिरणे, ५० पेक्षा अधिक व्‍यक्तिंनी एकाचवेळी एकत्र येणे, अशा नियमांचे उल्‍लंघन केल्‍यास तेथेही कारवाई करण्‍यात येईल.

१०) खेळाच्‍या मैदानांवर व उद्यानांमध्‍ये देखील विना मास्‍क आढळणाऱयांवर कारवाई करण्‍यात येईल.

११) कोविड बाधित रुग्‍णांची संख्‍या अधिक असलेल्‍या विभागांमध्‍ये मिशन झिरोच्‍या धर्तीवर कार्यवाही सुरु करावी. ज्‍या विभागांमध्‍ये नवीन रुग्‍ण मोठ्या संख्‍येने आढळून येत आहेत, तेथे एरिया मॅपिंग करुन, त्‍या क्षेत्रांमध्‍ये जास्‍तीत जास्‍त संख्‍येने चाचण्‍या करण्‍यात याव्‍यात. तसेच अशा परिसरांमध्‍ये प्रति रुग्‍णामागे किमान १५ नजीकच्‍या संपर्कातील व्‍यक्‍ती (हायरिस्‍क कॉन्‍टॅक्‍ट) शोधून त्‍यांना विलगीकरणात ठेवावे.

१२) झोपडपट्टी, अरुंद वस्‍ती, दाट वस्‍तींमध्‍ये बिगरशासकीय संस्‍थांच्‍या मदतीने आरोग्‍य तपासणी शिबिरांचे आयोजन करुन संशयितांची तपासणी करावी. फिरत्‍या दवाखान्‍यांच्‍या (मोबाईल व्‍हॅन) माध्‍यमातून रुग्‍ण शोध मोहीम सुरु ठेवावी. चाचण्‍या कराव्‍यात.

१३) प्रत्‍येक विभाग कार्यालयाच्‍या हद्दीमध्‍ये हाय रिस्‍क कॉन्‍टॅक्‍ट व्‍यक्तिंसाठी कोरोना काळजी केंद्र १ आणि लक्षणे नसलेल्‍या बाधितांसाठी कोरोना काळजी केंद्र २ असे दोन्‍ही संवर्गातील प्रत्‍येकी किमान एक केंद्र कार्यान्वित ठेवावे.

१४) भव्‍य कोविड उपचार केंद्र (जम्‍बो सेंटर्स) मधील क्षमतांचा आढावा घेऊन नियमित रुग्‍णशय्या, ऑक्सिजन रुग्‍णशय्या यांची पुरेशी उपलब्‍धता ठेवावी, असेही आयुक्‍तांनी नमूद केले.

१५) बृहन्‍मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शासकीय तसेच खासगी रुग्‍णालयांतून कोविड रुग्‍ण, रुग्‍णशय्या व इतर आवश्‍यक माहिती दर तासाने संकलित करुन ती माहिती डॅशबोर्डच्‍या माध्‍यमातून आपत्‍कालीन व्‍यवस्‍थापन खात्‍याने अद्ययावत करावी.

१६) केंद्र सरकारच्‍या नियमावलीप्रमाणे, आता ब्राझिलमधून भारतात येणाऱया प्रवाशांनाही संस्‍थात्‍मक विलगीकरणात रहावे लागणार आहे. यामुळे मुंबई विमानतळावर ब्राझिलमधून येणाऱया प्रवाशांना सक्‍तीने सात दिवसांच्‍या संस्‍थात्‍मक विलगीकरणात ठेवण्‍याचा निर्णय बृहन्‍मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतला असून त्‍याची अंमलबजावणी सुरु करण्‍यात आली आहे.

Related Posts
Translate »