प्रतिनिधी.
कल्याण – शेतकरी आंदोलनाच्या समर्थनासाठी केंद्र सरकारने केलेले शेतकरी विरोधी कायदे रद्द करावेत शेतमालाला किमान हमी भावाचे संरक्षण कायद्याद्वारे मिळावे, बाजार भाव पडल्यास कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्या चा माल सरकारने विकत घ्यावा आणि जिल्हा बँकेच्या माध्यमातून तात्काळ 50 टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची तरतूद कायद्यात करण्यात यावी या प्रमुख मागणीसह शेतकरी हिताच्या इतर मागण्यासाठी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला वंचित बहुजन आघाडी च्या वतीने अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये समर्थन देण्यासाठी कल्याण तहसील ला वंचित बहुजन महिला आघाडी , वंचित बहुजन आघाडी व सम्यक विद्यार्थी आंदोलन ठाणे जिल्हा कमिटीच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी ठाणे जिल्हा अध्यक्ष मायाताई कांबळे, सम्यक विद्यार्थी आंदोलन ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रतिक साबळे व उपाध्यक्ष रूपेश हुंबरे,ठाणे जिल्हा सचिव रेखाताई कुरवारे, उपाध्यक्ष रंजनी आगळे ,अल्काताई तायडे,रेखा उबाळे , जयश्री जावळे ,कल्याण ग्रामीण मा.अध्यक्ष संतोष गायकवाड संघटक देवानंद कांबळे उत्तम गवळी, धुळे वंचित बहुजन आघाडी विधानसभा उमेदवार आद.राजदीप आगळे यासह अंसख्य कार्यकर्ते उपस्थित होते.