महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
महाराष्ट्र लोकप्रिय बातम्या

अक्षय भालेराव हत्या प्रकरणी वंचित बहुजन युवा आघाडीने पोलिस अधीक्षक यांना निवेदन

नेशन न्यूज मराठी टीम.

नांदेड/प्रतिनिधी -नांदेड जिल्हयातील जातीयवादी गावगुंडानी बोंढार येथे बौद्ध तरुणाची अत्यंत निर्घृणपणे हत्या घडवून आणली आहे. परंतु पोलिसांनी “हत्येचा कट कलम १२० (ब)” लागू केला नाही असे वंचित बहुजन युवा आघाडी म्हणने आहे. त्यामुळे पोलिस अधीक्षक यांना वंचित बहुजन युवा आघाडीच्यावतीने खालील मागणीचे निवेदन सादर केले.

यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे राज्य सदस्य अक्षय बनसोडे, वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष धीरज हाके, वंचित बहुजन आघाडीचे नांदेड उत्तरचे माजी जिल्हा अध्यक्ष प्रशांत इंगोले, युवा आघाडीचे महासचिव वैभव लष्करे, शिधोधन येंगडे सह इतर उपस्थीत होते. १) लागू केलेल्या इतर कलमासह हत्येचा कट १२० ब लागू करणे.२) अटक केलेले आरोपी कुणाच्या संपर्कात होते त्याचा तपशील प्राप्त करणे जेणे करुन हत्येचा मास्टर माईंड कोन हे समजेल.३) पीडितांच्या कुटुंबाला पोलिस सुरक्षा प्रदान करणे.४) सर्व आरोपीची मालमत्ता जप्त करणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×