महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image क्रिडा ताज्या घडामोडी

महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा,पुणे-बारामती व नागपूर-चंद्रपूर-गोंदियास संयुक्त विजेतेपद

नेशन न्यूज मराठी टीम.

जळगाव/संघर्ष गांगुर्डे – महावितरणच्या आंतरपरिमंडलीय राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत पुणे-बारामती व नागपूर-चंद्रपूर-गोंदिया परिमंडलांच्या संघांनी संयुक्तरीत्या सर्वसाधारण विजेतेपदाचा मान मिळविला.येथील एकलव्य क्रीडा संकुलावर रविवारी (५ फेब्रुवारी) चारदिवसीय स्पर्धेचा समारोप झाला. सर्वाधिक ६२ गुण मिळविणाऱ्या पुणे-बारामती व नागपूर-चंद्रपूर-गोंदिया परिमंडलांच्या संघांना सर्वसाधारण विजेतेपद विभागून देण्यात आले.

महावितरणच्या कोकण प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांच्या हस्ते विजेत्यांना करंडक प्रदान करण्यात आला. यावेळी इतर संघ व उपस्थितांनीही टाळ्यांचा गजर व जल्लोष करीत विजेत्या संघांचे कौतुक केले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.मंगेश गोंदावले, कार्यकारी संचालक (वितरण/मानव संसाधन) अरविंद भादीकर, स्पर्धेच्या संयोजन समितीचे अध्यक्ष व मुख्य अभियंता कैलास हुमणे (जळगाव), भुजंग खंदारे (मुख्यालय), राजेंद्र पवार (पुणे), मुख्य जनसंपर्क अधिकारी अनिल कांबळे, महाव्यवस्थापक (मानव संसाधन) राजेंद्र पांडे, सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी ललित गायकवाड यांची उपस्थिती होती. यावेळी अधीक्षक अभियंता राजेंद्र मार्के (जळगाव), अनिल बोरसे (नंदुरबार), कैलास जमदडे (अहमदनगर), सहायक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) नेमीलाल राठोड, वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त व लेखा) देवेंद्र कासार, अमित सोनवणे, कार्यकारी अभियंता अनिरुद्ध नाईकवाडे, रमेशकुमार पवार, प्रदीप सोरटे, राम चव्हाण, एकलव्य क्रीडा संकुलाचे संचालक श्रीकृष्ण बेलोरकर, अनुभूती शाळेचे क्रीडा संचालक अरविंद देशपांडे हेही मंचावर होते.

सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी रामगोपाल अहिर यांनी बक्षीस वितरणाचे सूत्रसंचालन केले. उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अरुण शेलकर यांनी आभार मानले.पाहुण्यांच्या हस्ते सांघिक व वैयक्तिक खेळातील विजेते व उपविजेत्यांना सुवर्ण व रौप्यपदक तसेच प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. राज्यातील १६ परिमंडलांचे नाशिक-जळगाव, औरंगाबाद-लातूर-नांदेड, कल्याण- रत्नागिरी, सांघिक कार्यालय-भांडूप, नागपूर-चंद्रपूर-गोंदिया, अकोला-अमरावती, पुणे-बारामती व कोल्हापूर अशा ८ संयुक्त संघांतील ७३० पुरुष व ३५३ महिला असे एकूण १०८३ खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले होते.

 सांघिक खेळांचे अंतिम निकाल – अनुक्रमे विजेता व उपविजेता : क्रिकेट – पुणे-बारामती व नाशिक-जळगाव, व्हॉलिबॉल – कोल्हापूर व औरंगाबाद-नांदेड-लातूर, कबड्डी (पुरुष)- सांघिक कार्यालय-भांडूप व कोल्हापूर, कबड्डी (महिला)- सांघिक कार्यालय-भांडूप व पुणे-बारामती,  खो-खो (पुरुष)- पुणे-बारामती व कोल्हापूर, खो-खो (महिला)- सांघिक कार्यालय-भांडूप व कोल्हापूर, टेबल टेनिस (पुरुष)- नागपूर-चंद्रपूर-गोंदिया व कोल्हापूर, टेबल टेनिस (महिला)- अकोला-अमरावती व कोल्हापूर, बॅडमिंटन (पुरुष)- नागपूर-चंद्रपूर-गोंदिया व औरंगाबाद-नांदेड-लातूर, बॅडमिंटन (महिला)- पुणे-बारामती व नागपूर-चंद्रपूर-गोंदिया, कॅरम (पुरुष)- नागपूर-चंद्रपूर-गोंदिया व पुणे-बारामती, कॅरम (महिला)- नागपूर-चंद्रपूर-गोंदिया व कोल्हापूर, ब्रिज- औरंगाबाद-नांदेड-लातूर व नाशिक-जळगाव, टेनिक्वाईट महिला- नागपूर-चंद्रपूर-गोंदिया व औरंगाबाद-नांदेड-लातूर.
   

 वैयक्तिक खेळांचे अंतिम निकाल (कंसात संघ) –अनुक्रमे विजेते व उपविजेते पुढीलप्रमाणे – १०० मीटर धावणे – पुरुष गट – साईनाथ मसने (सांघिक कार्यालय-भांडूप) व गुलाबसिंग वसावे (पुणे-बारामती), महिला गट – प्रिया पाटील (सांघिक कार्यालय-भांडूप) व सरिता सरोटे (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया), २०० मीटर धावणे – पुरुष गट – गुलाबसिंग वसावे (पुणे-बारामती) व साईनाथ मसने (सांघिक कार्यालय-भांडूप), महिला गट – सरिता सरोटे (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया) व भूमिका भोयर (कोल्हापूर), ४०० मीटर धावणे – पुरुष गट – विजय भारे (नाशिक-जळगाव) व प्रदीप वंजारे (कोल्हापूर), महिला गट – श्वेतांबरी अंबाडे (औरंगाबाद-नांदेड-लातूर) व अश्विनी शिंदे (सांघिक कार्यालय-भांडूप), ८०० मीटर धावणे – पुरुष गट – प्रतीक वाईकर (पुणे-बारामती) व परेश चौधरी (नाशिक-जळगाव), महिला गट – श्वेतांबरी अंबाडे (औरंगाबाद-नांदेड-लातूर) व प्रिया पाटील (सांघिक कार्यालय-भांडूप), १५०० मीटर धावणे – पुरुष गट – प्रतीक वाईकर (पुणे-बारामती) व शुभम मात्रे (अकोला-अमरावती), महिला गट- अर्चना भोंग (पुणे-बारामती) व प्रेरणा रहाटे (सांघिक कार्यालय-भांडूप), ५००० मीटर धावणे – पुरुष – प्रफुल्ल राऊत (कल्याण-रत्नागिरी) व सचिन खटावकर (कोल्हापूर), ४ बाय १०० रिले – पुरुष गट – प्रदीप वंजारे, शुभम निंबाळकर, नरेश सावंत, संभाजी जाधव (कोल्हापूर) व प्रतीक वाईकर, सोमनाथ कांतीकर, कृष्णा लाड, गुलाबसिंग वसावे (पुणे-बारामती), महिला गट – प्रिया पाटील, सोनिया मिठबावकर, अश्विनी शिंदे, सारिका जाधव (सांघिक कार्यालय-भांडूप) व सुप्रिया लुंगसे, अर्चना भोंग, शर्वरी तिवटणे, माया येळवंडे (पुणे-बारामती), गोळा फेक – पुरुष गट – प्रवीण बोरावके (पुणे-बारामती) व हणमंत कदम (कोल्हापूर), महिला गट – स्नेहा सपकाळ (सांघिक कार्यालय-भांडूप) व पूजा ऐनापुरे (कोल्हापूर), थाळी फेक – पुरुष गट –  प्रवीण बोरावके (पुणे-बारामती) व धर्मेश पाटील (नाशिक-जळगाव), महिला गट- ज्योती कांबळे (कोल्हापूर) व संगीता यादव (औरंगाबाद-नांदेड-लातूर), भाला फेक – पुरुष गट – सचिन चव्हाण (कोल्हापूर) व नारायण मुंजाळ (औरंगाबाद-नांदेड-लातूर), महिला गट – सरिता सरोटे (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया) व अश्विनी जाधव (कोल्हापूर), लांब उडी – पुरुष गट – सोमनाथ कांतीकर (पुणे-बारामती) व मनोज धोंडगे (नाशिक-जळगाव), महिला गट –  सरिता सरोटे (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया) व  माया येळवंडे (पुणे-बारामती), उंच उडी – पुरुष गट – चेतन केदार ( नाशिक-जळगाव ) व महेश नागटिळक (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया), महिला गट – सोनाली मोरे (सांघिक कार्यालय-भांडूप) व अश्विनी देसाई (कोल्हापूर), बुद्धिबळ- पुरुष गट – अजय पंडित (पुणे-बारामती) व सौरभ माळी (कोल्हापूर), महिला गट –  अमृता जोशी (सांघिक कार्यालय-भांडूप)  व मोना बरेला (नाशिक-जळगाव), कॅरम – पुरुष गट – अनंत गायत्री (सांघिक कार्यालय-भांडूप) व इक्बाल खान (औरंगाबाद-नांदेड-लातूर), महिला गट – तेजश्री गायकवाड (सांघिक कार्यालय-भांडूप) व पुष्पलता हेडाऊ (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया), टेनिक्वाईट – महिला एकेरी – लीना पाटील  (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया) व मनीषा चौकसे (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया), महिला दुहेरी – शीतल नाईक- कोमल सुरवसे (पुणे-बारामती) व पल्लवी गायकवाड-भाग्यश्री कदम (औरंगाबाद-नांदेड-लातूर), टेबल टेनिस – पुरुष एकेरी – रितेश सव्वालाखे (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया) व शकील शेख (कोल्हापूर), पुरुष दुहेरी – रितेश सव्वालाखे – प्रमोद मेश्राम (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया) व मंगेश प्रजापत-कैलास जमदडे (नाशिक-जळगाव), महिला एकेरी – स्नेहल बढे (अकोला-अमरावती) व अश्विनी शिंदे (सांघिक कार्यालय-भांडूप), महिला दुहेरी- स्नेहल बढे-मनीषा बुरांडे (अकोला-अमरावती) व अश्विनी शिंदे-सायली कांबळे (सांघिक कार्यालय-भांडूप), बॅडमिंटन – पुरुष एकेरी – पंकज पाठक  (औरंगाबाद-नांदेड-लातूर) व लोकेश तळवेकर (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया), पुरुष दुहेरी –  पंकज पाठक-चेतन चौधरी (औरंगाबाद-नांदेड-लातूर) व इम्रान तासगावकर-गणेश काकडे (पुणे-बारामती), महिला एकेरी – वैष्णवी गांगारकर (पुणे-बारामती) व ऋतिका नायडू (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया), महिला दुहेरी – वीणा सगदेव- ऋतिका नायडू (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया) व विदुला पाटील-चैत्रा पै (कोल्हापूर), ब्रिज- पंकज आखाडे-महेश मेश्राम (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया) व प्रशांत गोंधळेकर-प्रशांत गायकवाड (अकोला-अमरावती), कुस्ती – ५७ किलो – आकाश लिंभोरे (पुणे-बारामती) व गोरख रानगे (कोल्हापूर), ६१ किलो – विनोद गायकवाड (अकोला-अमरावती) व सुखदेव पुजारी (कोल्हापूर), ६५ किलो – राजकुमार काळे (पुणे-बारामती) व सूर्यकांत गायकवाड (नाशिक-जळगाव), ७० किलो – उत्तम पाटील (कोल्हापूर) व महादेव दहिफळे (औरंगाबाद-नांदेड-लातूर), ७४ किलो -गुरुप्रसाद देसाई (औरंगाबाद-नांदेड-लातूर)  व अकील मुजावर (पुणे-बारामती), ७९ किलो – संदीप नेवारे (अकोला-अमरावती) व युवराज निकम (कोल्हापूर), ८६ किलो – अमोल गवळी (पुणे-बारामती) व भूषण चौधरी (नाशिक-जळगाव), ९२ किलो – वैभव पवार (पुणे-बारामती) व महेंद्र कोसारे (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया) , ९७ किलो – मोहंमद अन्वर (अकोला-अमरावती) व प्रमोद ढेरे (कोल्हापूर) आणि १२५ किलो – भानुदास विसावे (नाशिक-जळगाव) व हणमंत कदम (कोल्हापूर).

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »